आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Narayan Rane Press Confernce At Mumbai, Resigned Ministership

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हायकमांडने शब्द पाळला नाही, समर्थकांचीही फरफट केल्याने मी नाराज- नारायण राणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र- पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे (छायाचित्र स्त्रोत- वृत्तसंस्था)
मुंबई- काँग्रेस पक्षावर व पक्षश्रेष्ठींवर मी नाराज आहे. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आल्यावर सहा महिन्यांत मला मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिल्लीतील नेत्यांनी दिला होता. मात्र नऊ वर्षे झाल्यानंतरही तो पाळला नाही. माझ्यासोबत आलेल्या विद्यमान आमदारांपैकी एकालाही मंत्रिपद दिले नाही की महामंडळावर घेतले नाही. समर्थकांना तिकिटे दिली नाहीत त्यांचीही माझ्यासोबत फरफट झाली असे सांगत काँग्रेस नेते नारायण राणेंनी काँग्रेस हायकमांड व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कारभारावर कडक शब्दांत टीका केली.
राणे यांनी आज दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेऊन आपल्या उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन आपल्या भूमिकेबाबत माहिती दिली. राणे म्हणाले, मी आज दुपारी राजीनामा दिला मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. याचबरोबर राजीनामा का देत आहे याची कारणे देताना एक पत्र दिले आहे. त्यात जनतेच्या मागण्या व मला वाटत असलेली मते मांडली आहेत. मुख्यमंत्री चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात कोणतेही ठोस निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे जनतेत मोठी नाराजी आहे. लोकसभेला काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. संथ कारभाराचा पक्षाला फटका बसला. मुख्यमंत्र्यांनी जनतेसाठी अपेक्षित निर्णय घेतले नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीतही असाच पराभव शक्य आहे. त्या पराभवात माझा वाटा नसावा म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. मात्र आपण काँग्रेस पक्षातच राहणार आहे. आपण नवा पक्ष स्थापन करण्याचा किंवा इतर पक्षात जाण्याचा अद्याप निर्णय घेतला नाही. मंत्रिपदाचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ असेही राणे यांनी सांगितले.
काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे गेली दोन वर्षापासून मी पक्षावर नाराज आहे. सहा महिन्यांत मुख्यमंत्रीपद देऊ असे दिल्लीतील नेत्यांनी मला सांगितले. मात्र 9 वर्षे आपण वाट पाहिली. मात्र संधी दिली गेली नाही. शिवसेनेतून माझ्यासमवेत अनेक आमदार आले. त्यांना एकालाही मंत्रिपद दिले नाही. महामंडळ दिले नाही की विधान परिषदेवर संधी दिली नाही. त्यामुळे समर्थक नाराज झाले व ते काँग्रेस सोडून इतर पक्षात जात आहेत. पक्षाने त्यांना संधी न दिल्याने व मलाही पक्षात मानाचे स्थान न दिल्याने मी त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही याची मला खंत आहे. मुख्यमंत्री स्वच्छ आहेत पण त्यांच्या कारभाराबाबत जनतेत नाराजी आहे. नारायण राणेंना काय वाटते हे महत्त्वाचे नसून, जनतेला काय वाटते हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण राजीनामा देत आहोत, असेही राणेंनी सांगितले.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी पक्षप्रमुख सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ व त्याची माहिती देऊ असे सांगितल्याचे राणेंनी सांगितले. आज रात्री कदाचित आमची पुन्हा भेट होण्याची शक्यता आहे. मी काँग्रेस संस्कृतीत पूर्णपणे रूळलो आहे. त्यामुळेच मी गेली नऊ वर्षे पक्षात काम करू शकलो व शांतपणे थांबलो. तसेच हे माझे बंड नाही, फक्त माझ्या भावना व्यक्त करीत आहे असे सांगत तडजोडीच्या फॉर्म्यूल्यावर तयार असल्याचे राणेंनी पत्रकार परिषदेत संकेत दिले. राणेंना प्रदेशाध्यक्षपद दिल्यास राणेंचे संभाव्य बंड थंड होईल असे बोलले जात आहे.
मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल- नारायण राणेंचा रोख मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दिशेने स्पष्ट होता. मुख्यमंत्री नुसतेच स्वच्छ असून काय उपयोग, जनतेची कामे होणे महत्त्वाचे असते. भ्रष्टाचार रोखण्यात चव्हाण यांना अपयश आले आहे. प्रशासन सुस्त झाले आहे. अधिकारी काम करीत नाहीत की निर्णयाची अमलबंजावणी करीत नाहीत. त्यामुळे जनतेत नाराजी वाढत चालली आहे. सरकार आणि पक्षात कसलाही समन्वय नसल्याने जनमत सरकारच्या विरोधात तयार होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली विधानसभेत विजय मिळविणे अशक्य असल्याचे मत राणेंनी व्यक्त केले.
सोनिया गांधींशी चर्चा करून निर्णय- मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण, वाचा पुढे...