आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजन तेलींचा प्रचार करणार नाही- सिंधूदुर्ग जिल्हा काँग्रेसचा ठराव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंधूदुर्ग- सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संभाव्य आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजन तेली यांचा प्रचार करणार नाही असा ठराव सिंधूदुर्ग जिल्हा काँग्रेसने मंजूर केला आहे. नारायण राणे यांचे समर्थक असलेले माजी आमदार तेली हे नुकतेच काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेले आहेत.
लोकसभा निवडणुकीत राजन तेली यांनी निलेश राणे यांच्याविरोधात काम केल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला होता. त्यावरून तेली-राणे कुटुंबियांत वाद पेटला होता. त्यानंतर राजन तेलींना आपला गळा कापला. ज्या राजन तेलींना खायला काही नव्हते त्यांना आपण ताकद दिली त्यांनीच माझ्याशी गद्दारी केली अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली होती. मात्र, राष्ट्रवादीचे नेते व आमदार दीपक केसरकर यांनी मागील महिन्यात शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सावंतवाडीतून राष्ट्रवादीला संतुलित उमेदवार मिळत नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादीने राजन तेलींना पक्षात प्रवेश दिला आहे.
दरम्यान, सिंधूदुर्ग काँग्रेसवर सध्या राणेंचे एकहाती वर्चस्व आहे. त्यामुळेच जिल्हा काँग्रेसने तेलींचा प्रचार करणार नाही असा ठराव मंजूर केला आहे. दरम्यान, काँग्रेस व राष्ट्रवादीत अद्याप आघाडीच झाली नसल्याने याला फारसे राष्ट्रवादीने महत्त्व दिलेले नाही.