आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Narayan Rane Ready Once Again For Working With Congress

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राणेंचे पुन्हा 'जय काँग्रेस', कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कार्यकर्त्यांसोबतचे ऋणानुबंध सहजासहजी तुटत नाहीत. लोकसभेला झालेला पराभव विसरा आणि आगामी विधानसभेसाठी कामाला लागा असे सांगत उद्योगमंत्री नारायण राणे हे पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. याचबरोबर राणेंकडून पक्षातील होऊ घातलेले संभाव्य बंड त्यांनी स्वत:च शमविले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मी हरलो नाही, हरणारही नाही! मी माणूस आहे. नैराश्य जरूर असेल पण कोकणच्या मातीशी, येथील जनतेशी गेल्या 25 वर्षात जे संबंध जोडले ते तोडण्यासाठी नाहीत असे गर्वाची व अहंकाराची भाषा मात्र कायम ठेवली आहे.
नारायण राणेंचे चिरंजीव खासदार निलेश राऊत यांचा कोकणात दारूण पराभव झाला. मुलांच्या पराभवामुळे राणे खचले होते. त्यामुळे त्यांनी थेट काँग्रेस पक्षावर व त्याच्या धोरणावरच हल्लाबोल केला. याचबरोबर उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा देत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर दबाव आणला होता. कॅबिनेट बैठकीला व पक्षाच्या एक-दोन बैठकीला त्यांनी दांडी मारली होती. याचबरोबर राणे काँग्रेस सोडणार असल्याची बातम्या येऊ लागल्या होत्या. दोन-चार दिवसात एक चांगली बातमी देतो असे राणेंनी पत्रकारांनाही सांगितले होते. त्यामुळे राणे काँग्रेस सोडून भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते.
मात्र त्याचदरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते व राणेंचे मित्र गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. तिथेच त्यांच्या भाजप प्रवेशाला अपशकून झाला. अखेर भाजपच्या नेत्यांनी राणेंना भाजपमध्ये स्थान दिले जाणार नाही असे जाहीर करावे लागले व राणेंच्या काँग्रेस सोडण्याच्या बातम्या यायच्या थांबल्या. कारण शिवसेनेत व राष्ट्रवादीत राणेंना हवी तशी मोकळीक मिळणार नाही हे ते जाणून होते. त्यामुळे राणेंनी इतर पक्षात न जाता पुन्हा काँग्रेसमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला.
चार दिवसापूर्वी राणेंनी सोनिया गांधींची भेट घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर सोनियांनी ही वेळ नाराजी व्यक्त करण्याची नाही तसेच आत्मपरीक्षणांची आहे असे सांगून कामाला लागण्याचे आदेश दिले होते. सोनियांच्या भेटीनंतर राणे पुन्हा ताजेतवाने झाले असून, त्यांनी पक्षाबाबत असलेली आडी दूर करून पुन्हा कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
पुढे वाचा, राणेंनी कार्यकर्त्यांना काय डोस पाजले...