आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्थापनेला काँग्रेसला माेठा धक्का देण्याची राणेंची घाेषणा; निवडणुका स्वतंत्रपणे लढणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नारायण राणे पुढील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. कारण भाजपच्या वाटेवर असलेल्या राणेंनी दस-यापूर्वीच सीमोल्लंघन करणार असल्याचे म्हटले आहे. - Divya Marathi
नारायण राणे पुढील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. कारण भाजपच्या वाटेवर असलेल्या राणेंनी दस-यापूर्वीच सीमोल्लंघन करणार असल्याचे म्हटले आहे.
मुंबई- काँग्रेसने सिंध्ुदुर्ग जिल्हा  कार्यकारिणी बरखास्त केल्यामुळे संतापलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी या जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन करून अापल्या पक्षाविराेधात बंडाचा झेंडा फडकवला. आधी गोवा ते कुडाळ अशी कार्यकर्त्यांसोबत रॅली काढून त्यांनी ‘अापली ताकद’ दाखवून दिली. नंतर कुडाळमध्ये झालेल्या जाहीर सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह पक्षाच्या कार्यपद्धतीवर राणे पिता-पुत्रांनी जोरदार हल्लाबोल केला. तसेच आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुका काँग्रेसऐवजी आपल्या नव्या समर्थ विकास पॅनलकडून लढवण्याचीही घोषणा केली. तसेच २१ सप्टेंबरला घटस्थापनेच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन कोण कोणाला धक्का देतो, हे दाखवून देतो, असा धमकीवजा इशाराही राणेंनी दिला.  
 
नारायण राणे अाणि त्यांची मुले राजकारणात राहणार आहोत, असे स्पष्ट करून राणेंनी आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आपली ताकद काँग्रेससह विरोधी पक्षांना दाखवून देऊ, असा इशारा दिला. ‘एकाच वेळी मी अनेक धक्के देणार नाही. एका वेळीच एकच धक्का!  गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दुसरा धक्का देईन. राणेंना डिवचले की त्यांना डबल ताकद येते,’ असा दावाही त्यांनी केला.  
 
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता सामंत हेच असून जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्याचा अधिकार अशोक चव्हाण व मोहन प्रकाश यांना नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस असा निर्णय घेऊ शकत नाही. चव्हाण व प्रकाश यांना राणे कळलेला नाही. जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करताना मला साधे विचारलेदेखील नाही. ज्यांची ताकद नाही अशा विकास सावंत यांना जिल्हा अध्यक्ष केले. सावंत यांच्यात काँग्रेसचा एक माणूस तरी जिंकून आणण्याची ताकद आहे का, असा सवाल उपस्थित करताना राणेंनी थेट चव्हाणांना आव्हान दिले. ‘आम्ही ठरवू तोपर्यंत पदे आमच्याकडे राहतील, ती काढून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही,’ असे ते म्हणाले. 
 
राऊतांना हरवल्याशिवाय नीलेश दाढी करणार नाही  
नारायण राणे यांचे थोरले चिरंजीव व माजी खासदार नीलेश यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर या वेळी जोरदार टीका केली. सन २०१४ च्या निवडणुकीत राऊत यांनी त्यांचा पराभव केला हाेता. ताे संदर्भ घेऊन नीलेश म्हणाले. ‘सन २०१९ च्या निवडणुकीत राऊत यांना पराभूत केल्याशिवाय मी दाढी करणार नाही,’  अशी शपथ त्यांनी जाहीरपणे घेतली. त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला.
 
अशोक चव्हाणांनी काँग्रेस संपवली
अशोक चव्हाणांनी राज्यात काँग्रेस संपवली असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने ते सत्ताधाऱ्यांना धारेवर धरू शकत नाहीत. एक सिंध्ुदुर्ग जिल्हा सोडला तर महाराष्ट्रातील एकाही जिल्ह्यात काँग्रेसची ताकद उरलेली नाही. चव्हाणांच्या नेतृत्वाखाली राज्यात सलग सात निवडणुका काँग्रेस हरली आहे. त्यांच्या नांदेडमध्येही काँग्रेसला जनाधार नाही. रत्नागिरीसह ९ जिल्ह्यांमध्ये पक्षाला जिल्हाध्यक्ष व कार्यकारिणी नाही. काँग्रेस संपवण्याची सुपारी घेतलेल्या चव्हाणांनी िसंधुदुर्ग जिल्हा बरखास्त केला अाणि खबऱ्याचे काम करणाऱ्या िवकास सावंत यांना  जिल्हाध्यक्ष केले. पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसेल तर आम्ही काय शांत बसायचे का, असा हल्लाबोल राणेंनी केला. 
 
भाजपात जाऊन मंत्रिपद मिळविण्यासाठी नारायण राणेंची घालमेल
सिंधुदुर्ग काँग्रेस िजल्हा कार्यकारिणी बरखास्त करून काँग्रेसने अप्रत्यक्षपणे नारायण राणेंनाच ‘बाहेरचा रस्ता’ दाखवल्यामुळे अस्वस्थ झालेल्या राणेंनी काँग्रेसच्या नेत्यांवर टीकेची झाेड उठवली अाहे. एकीकडे भाजपमध्ये जाण्याची नुसतीच चर्चा हाेत असताना हा निर्णय लवकरात लवकर  घेऊन मंत्रिपद पदरात पाडून घेण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.   
राणे काँग्रेस सोडणार हे अाता निश्चित झाले अाहे. काेकणातील अागामी ग्रामपंचायत निवडणुका स्वतंत्रपणे लढवून ३२५ पैकी िनम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायत  िजंकून आपली ताकद दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. याच वेळी त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चेचे मार्ग खुले ठेवले आहेत. अनेक महिन्यांपासून राणे भाजपात जाणार असल्याची चर्चा अाहे. हाॅस्पिटलच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी िकंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना बाेलावून पक्षप्रवेश दणक्यात प्रवेश करण्याचे त्यांचे नियाेजन हाेते, मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना दाद दिली नाही. मुख्यमंत्री फडणवीसही सुरुवातीला राणेंना भाजपमध्ये घेण्यास उत्सुक नव्हते. अाताही आमच्या अटींवरच प्रवेश देऊ, अशी त्यांनी भूमिका घेतलेली अाहे.  दिवाळीनंतर राज्यात मंत्रिमंडळ िवस्तार होण्याची चर्चा अाहे. तत्पूर्वी भाजपमध्ये जाऊन एखादे महत्त्वाचे मंत्रिपद पदरात पाडून घेण्याचाही राणेंचा प्रयत्न असेल.  राणेंना आपल्या दोन्ही मुलांची मोठी िचंता आहे. नीलेश राणे यांना लोकसभा निवडणुकीत भाजपने तिकीट द्यावे व आमदार िनतेश यांना किमान राज्य मंत्रिपद मिळावे, अशीही त्यांची अपेक्षा अाहे. मात्र अाधी तुमचे सांगा, मुलांची अट नकाे, असे भाजपने त्यांना ठणकावून सांगितले अाहे. त्यामुळे घटस्थापनेला राणे तूर्त तरी एकटेच भाजप प्रवेश करण्याची शक्यता अाहे.
बातम्या आणखी आहेत...