आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narayan Rane Says, I Speak About My Resignation In Cabinet

कॅबिनेटमध्ये राजीनाम्याची धमकी दिली होती, राणेंच्या खुलाशाने मुख्यमंत्री तोंडावर आपटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- इको सेन्सिटिव्ह झोनच्या मुद्यांवरून आपण काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजीनाम्याची धमकी दिली होती, असे उद्योगमंत्री नारायण यांनी म्हटले आहे. राणे यांनी असे सांगून व वक्तव्य करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तोंडावर पाडल्याचे बोलले जात आहे.
राणे यांनी याबाबत अधिक बोलताना म्हटले आहे की, इको सेन्सिटिव्ह झोनच्या विरोधात आपण आहोत. याचबरोबर कोकणातील लोकांवर माधव गाडगीळ व डॉ. कस्तुरीरंगन समितीने केलेल्या शिफारशीमुळे अन्याय होऊ देणार नाही. यासाठी आपण कोणतेही पाऊल उचलू. कॅबिनेटमधल्या गोष्टी यापूर्वी आपण कधीही बोललो नाही, पण आता बोलायची वेळ आणली आहे, असे सांगून कालच्या बैठकीत पतंगराव कदमांशी आपला या मुद्यांवरून वाद झाला होता याची कबुली दिली.
दरम्यान, आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राणे यांनी बैठकीत अशी धमकी दिली नसल्याचे म्हटले होते. तरीही नारायण राणे यांनी याबाबत खुलासा करणे म्हणजे कोकणवासियांच्या पाठीशी आपण असल्याचे सिद्ध करण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांना तोंडावर पाडणे या दोन्ही गोष्टी राणेंनी साध्य केल्या आहेत. त्यामुळे राणे असे सांगून एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे.
पुढे वाचा, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पतंगराव कदम काय म्हणाले आहेत...