आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादीचे माझ्याविरोधात एकत्र आले- नारायण राणे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मी लवकरच आमदार होणार आहे. येत्या काही काळात काहीही होऊ शकतं. भाजपने आज घेतलेली भूमिका मला मान्य आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना-काँग्रेस- राष्ट्रवादीने माझ्याविरोधात मोहिम हाती घेतली. तरीही मी निवडून आलो असतो. माझ्यामुळे शिवसेनेत फूट पडली असती, त्यामुळे शिवसेनेने माझ्या उमेदवारीला विरोध केला. मात्र, मी मुख्यमंत्री राहिलो आहे. आमदारकी माझ्यासाठी नविन नाही, असे सांगत नारायण राणे यांनी भाजपने विधान परिषदेसाठी डावलल्यानंतर आपली भूमिका मांडली.

 

भाजपने शिवसेनेच्या विरोधामुळे नारायण राणे यांचा पत्ता कापत प्रसाद लाड यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. यानंतर भाजपने स्वाभिमानीच्या वाटेत काटे पेरल्याच्या बातम्या येऊ लागल्या. आज सकाळपासून मिडियात राणेंचा पत्ता कट अशा बातम्या येऊ लागताच राणे माध्यमांसमोर आले आणि त्यांनी आपली भूमिका मांडली.

 

 

राणे म्हणाले, मी मुख्यमंत्री राहिलो आहे. गेली अनेक वर्षे मी आमदार, मंत्री राहिलो आहे. हे माझ्यासाठी नविन नाही. मी विधान परिषदेसाठी निवडून आलो असतो. माझ्या उमेदवारीवरून शिवसेनेत फूट पडली असती. त्यामुळे शिवसेनेने मला विरोध केला व काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू केली. त्यामुळे भाजपने जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे.

बातम्या आणखी आहेत...