आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव जी स्वप्न पाहतात, ती कधीच पूर्ण होत नाहीत- नारायण राणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे हे जे स्वप्न पाहतात ती कधीच पूर्ण होत नाहीत, असा टोला उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मारला.

महालक्ष्मीच्या रेसकोर्सवर जगातील नववे आश्चर्य ठरू शकेल असे भव्य उद्यान उभारण्याचे स्वप्न उद्धव यांनी पाहिले आहे. तसेच त्याबाबतचे संकल्पचित्र काल दाखवले गेले. तसेच येत्या काही दिवसातच हे संकल्पचित्र मुंबई महापालिकेच्यावतीने राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. रेसकोर्सच्या भाडेपट्ट्याची मुदत शुक्रवारी संपत असताना शिवसेनेकडून मुंबईकरांच्या सेवेसाठी अत्याधुनिक उद्यानाचा संकल्प जाहीर करण्यात आले.

मुंबईत सामान्यांना आपल्या व्यथा, चिंता बाजूला ठेवून बसावे असे ठिकाण नाही. त्यामुळे रेसकोर्सच्या जागेवर जागतिक दर्जाच्या उद्यानाचे स्वप्न पाहत आहे. यामुळे मुंबईकरांची सोय तर होईलच, पण ते पाहण्यासाठी परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने मुंबईत येऊ शकतील,’ अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. त्याचा समाचार राणे यांनी आपल्या शैलीत घेतला. राणे आणि शिवसेना यांचे वितृष्ट जगजाहीर आहे. विशेषत त्यांनी उद्धव ठाकरे यांना पुढे केल्यामुळेच शिवसेना सोडली होती. आता शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी मिळताच, उद्धव ठाकरे जी स्वप्न पाहतात ती कधीच पूर्ण होत नाहीत, असे सांगत त्यांनी टोला हाणला. आता शिवसेना राणे यांना आपल्या स्टाईलने कसे उत्तर देते ते येत्या एक-दोन दिवसात कळेलच.

रेसकोर्सच्या जागेबाबत शिवसेनेची काय भूमिका व काय आहे या दाखवलेल्या संकल्पचित्रात, वाचण्यासाठी पुढे क्लिक करा...