आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narayan Rane Towords To Delhi For Meet To Sonia Gandhi

बंडोबा थंडोबा?: राणे दिल्लीत, पक्षश्रेष्ठींकडे मांडणार कैफियत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- नारायण राणे)
मुंबई- उद्योगमंत्री नारायण राणे आज दुपारी 12 च्या सुमारास पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. राणे यांची काल रात्री राहुल गांधी यांच्यासमवेत फोनवरून चर्चा झाल्याचे कळते. त्यावेळी मी दिल्लीत येऊन भेटतो असे राणेंनी सांगितले होते. त्यानुसार ते राहुल व सोनिया यांना भेटणार आहेत. दुपारी साडेचार वाजता राहुल गांधींची भेट घेतील व 6 नंतर सोनियांशी भेट होणार असल्याचे कळते. दरम्यान, राणेंचे फक्त म्हणणे ऐकून घेतले जाईल. मात्र त्यांना कोणतेही आश्वासन दिले जाणार नाही. राणेंनी बंड थंड केल्याचे संकेत दिले असले तरी त्यांनी हा विषय प्रतिष्ठेचा करीत आपली नाचक्की होऊ नये म्हणूनच सोनियांची भेट घेत आहेत. मात्र राणे उघडे पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन दिवसापूर्वी राणे यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांची वर्षावर भेट घेऊन दोन तास चर्चा केली होती. तसेच राणेंच्या कोणत्या अडचणी आहेत याची माहिती घेतली होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेही उपस्थित होते. त्यानंतर राणेंनी माणिकराव ठाकरे व चव्हाण आम्ही तिघे सोनियांना भेटणार असल्याचे माध्यमांना सांगितले होते. मात्र, आज राणे एकटेच दिल्लीला गेल्याचे दिसून येत आहे. यावरून राणेंचे बंड थंड होणार असल्याचे स्पष्ट होतच आहे. याचबरोबर काँग्रेसने त्यांना कोणतेही अवास्तव महत्त्व न देण्याची भूमिका कायम ठेवली आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांनी राणेंच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राणेंना आपले बंड थंड करण्यावाचून पर्याय नाहीये. बुधवारी प्रदेशाध्यक्ष ठाकरेंनी राणे काँग्रेस पक्षातच राहतील व कदाचित राजीनामाही मागे घेतील असे संकेत दिले होते.