आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसऱ्यापूर्वी सीमोल्लंघन; राणेंचा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीनंतर इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवत दसऱ्यापूर्वी सीमोल्लंघन करणार असल्याचा सूचक इशारा दिला आहे. - Divya Marathi
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवत दसऱ्यापूर्वी सीमोल्लंघन करणार असल्याचा सूचक इशारा दिला आहे.
मुंबई- ‘काँग्रेसने माझी कायम निराशा केली, दिलेली आश्वासने  कधीच पाळली नाहीत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण सध्या काँग्रेस संपवण्याचे काम ‘इमानेइतबारे’ करत अाहेत, ते एकटेच राज्यातली काँग्रेस संपवण्यास पुरेसे आहेत’ अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी रविवारी केली. नवरात्रात आपले सीमोल्लंघन ठरल्याचे उत्तर त्यांनी भाजप प्रवेशाबाबतच्या प्रश्नावर दिले.  

गेली सहा महिने राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचे वर्चस्व असलेली काँग्रेसची सिंधुदुर्ग िजल्हा कार्यकारिणी बरखास्त करून अशोक चव्हाण यांनी त्यांना दणका दिला हाेता. त्यामुळे चवताळलेल्या राणेंनी चव्हाण यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. ‘चव्हाण यांना त्यांचा नांदेड िजल्हा सांभाळता येत नाही, ते काय महाराष्ट्रात काँग्रेस वाढवणार, असा टोलाही राणे यांनी लगावला. चव्हाण व काँग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश यांनी आपल्याविरोधात कायम कटकारस्थाने केल्याचे राणे म्हणाले.   चव्हाण यांनी सिंधुदुर्ग िजल्हाध्यक्ष म्हणून नेमलेले  विकास सावंत यांना िजल्ह्यात कोणी पुसत नाही, केवळ माझा विरोधक म्हणून त्यांची नियुक्ती केल्याचे राणे म्हणाले.
 
मंत्रिमंडळात संधी?
कोकणात शिवसेनेची ताकद माेठ्या प्रमाणावर. तर भाजप या भागात कमजोर आहे. त्यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठी व कोकणात पक्षवाढीसाठी राणेंचा उपयाेग करुन घेण्याचा भाजपचा प्रयत्न अाहे, असे सांगितले जाते. नारायण राणे यांना पक्षात प्रवेश देऊन फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातही स्थान देण्याचाही विचार भाजपकडून केला जात असल्याची चर्चा अाहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...