आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणे 8 डिसेंबरपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर; पहिली जाहीर सभा कोल्हापुरात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणारे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्राच्या दौरावर येत आहेत.त्यांची पक्ष स्थापनेनंतर पहिलीच जाहीर सभा कोल्हापूरमध्ये होणार आहे, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

नारायण राणे हे 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी खासगी हेलिकॉप्टरने कोल्हापूर विमानातळावर आगमन होणार आहे. कोल्हापुरात आगमन झाल्यानंतर नारायण राणे हे सर्वप्रथम राजर्षी शाहू जन्म स्थळाला भेट देणार देवून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तेथून आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत.

 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे हे 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल पंचशील येथे कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी गाठीभेटी आणि त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नंतर दुपारी 1 ते दुपारी 4 वाजेपर्यंत त्यांचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. दुपारी 4 वाजता नारायण राणे यांची शासकीय विश्राम गृहावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

 

सायंकाळी 6 वाजता येथील दसरा चौकात नारायण राणे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेला माजी खासदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सभेला अशोक पाटील (तात्या), जयेश कदम, माजी आमदार सुरेश साळोखे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील राजकीय नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.

 

नारायण राणे यांनी आपल्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाच्या स्थापनेनंतर राज्यातील पहिलीच जाहीर सभा करवीरनिवासिनी आई अंबाबाईच्या कोल्हापुरात घेवून येथूनच संपूर्ण राज्यभरात पक्ष वाढीचे काम सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापुरातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...