मुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या घडामोडींना वेग आला आहे. येत्या 27 ऑगस्टला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबई दौर्यावर येत आहे. अमित शहा, नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा होणार आहे. मात्र, राणे यांचा भाजप प्रवेशाचा मुहुर्त मात्र अनिश्चत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
केवळ औपचारीकता बाकी...
अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावेळी नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकताच बाकी असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली होती. दुसरीकडे, राणे भाजपमध्ये आल्यास त्याचा भाजपला किती फायदा होईल, याचीही चाचपणी भाजपकडून मागील काही दिवसांपासून सुरु आहे.
पुढील स्लाइडवर वाचा...सार्वजनिक बांधकाम खाते राणेंना देण्याची तयारी...