आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममता कुलकर्णीला कोर्टाचा दणका, मुंबईतील 3 फ्लॅट जप्‍त करण्‍याचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-  एकेकाळची बॉलिवूड अॅक्‍ट्रेस ममता कुलकर्णीला अमली पदार्थ विशेष न्‍यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. तिचे मुंबईमधील अंधेरीतील 3 फ्लॅट जप्‍त करण्‍याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तसेच ममताविरोधात कोर्टाने रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे.
 
आंतरराष्‍ट्रीय तस्‍कर विकी गोस्‍वामीला 2000 कोटींचे ड्रग तस्‍करी करण्‍यासाठी ममता कुलकर्णीने मदत केली, असा आरोप तिच्‍यावर 2016 मध्‍ये लावण्‍यात आला होता. त्‍यानंतर अटकेची शक्‍यता लक्षात घेत ममता फरार झाली होती. तेव्‍हापासून विशेष तपास पथक ममता आणि विकी या दोघांचा शोध घेत आहे. अमली पदार्थ विशेष न्‍यायालयानेही त्‍यांना फरार घोषित केले आहे. कायद्यानूसार फरार घोषित व्‍यक्‍तीची देशातील सर्व मालमत्‍ता त्‍याला अटक करे पर्यंत जप्‍त केली जाते.  त्‍याअनुषंगाने कोर्टाने हा आदेश दिला आहे.
 
मुंबईत आहेत 3 थ्री बीएचके
ममता कुलकर्णीचे अंधेरीतील वर्सोवा भागातील एका इमारतीत 3 थ्री बीएचके फ्लॅट आहेत. कोर्टाच्‍या आदेशानूसार विशेष पथक लवकरच फ्लॅट जप्‍तीची कारवाई पूर्ण करणार आहे. या संदर्भातील कागदपत्रे न्‍यायालयता सादर करण्‍यात आली आहेत.  
 
बातम्या आणखी आहेत...