आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानच्या पंतप्रधानांना महाराष्ट्राच्या गजनृत्याची सलामी, केले राज्याचे प्रतिनिधित्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी सायंकाळी चार वाजता अहमदाबादमध्ये मोदी-अबे यांचा शो पार पडला. - Divya Marathi
बुधवारी सायंकाळी चार वाजता अहमदाबादमध्ये मोदी-अबे यांचा शो पार पडला.
मुंबई- भारत आणि जपान यांच्या संयुक्त योगदानातून राबविण्यात येत असलेल्या व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील महत्वकांक्षी 'मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन' प्रकल्पाच्या भूमिपूजन आज गुजरातमधील साबरमती येथे पार पडला. मात्र, त्यापूर्वी बुधवारी दुपारी अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आंबे यांचा ऐतिहासिक रोड शो झाला. 

या रोड शो दरम्यान 28 छोटे छोटे स्टेज उभारण्यात आले होते. प्रत्येक स्टेजवर 28 राज्यातील 28 लोककला सहभागी झाल्या होत्या. यात आरेवाडी ( जि. सांगली ) येथील गजनृत्य पथकाने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आपली भारदस्त कलेतून रोड शोला सलामी दिली. महाराष्ट्राच्या या ढंगदार लोककलेने गुजरातवासीयांना नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण करून दिली.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, गजनृत्य पथकाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...