आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या डुप्लिकेटलाही वाढती मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मालाडचे रहिवासी विकास महंते यांना सध्या प्रचंड मागणी आहे. ते हुबेहूब नरेंद्र मोदींसारखे दिसतात. प्रथमदर्शनी तर अनेक जणांचा ते मोदीच असल्याचा गैरसमज होतो. जवळून पाहिल्यास लक्षात येते की, ते मोदी नाहीत तर त्यांचे डुप्लिकेट आहेत.

भाजपच्या सहकारी पक्षांचे अनेक उमेदवार 52 वर्षीय महंते यांना अनेक सभा-समारंभांमध्ये खास निमंत्रित करत आहेत. तथापि, विकास महंते यांना राजकारणाची फारशी गोडी नाही, परंतु निवडणूक निकालाच्या भाकितांमुळे ते स्वत:ला रोखू शकले नाहीत. महंते म्हणतात, मलाही मोदी लाट दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यात मोदी मुंबईत आले होते त्या वेळी त्यांना पाहण्यासाठी मीही सभेला गेलो होतो. लोकांचा गैरसमज झाल्याने त्यांच्याभोवती गराडा पडला. पोलिसांनी महत्प्रयासाने त्यांना चाहत्यांच्या गराड्यातून बाहेर काढले. चेहरेपट्टी, हावभाव आणि वेशभूषेप्रमाणेच त्यांना मोदींप्रमाणे कवितांचाही छंद आहे. शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी महंते यांना रोड शोसाठी बोलावले होते. मोदींसारखा चेहरा असल्याने महंते लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहेत, असे कीर्तिकर यांनी सांगितले.