आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Film Caming Soon On Marathi Screen, Latest Newa

नरेंद्र मोदींचे ‘सुराज्य’ मराठी पडद्यावर अवतरणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘मंदिर उभारण्यापेक्षा देशातील जनतेला शौचालयांची व्यवस्था करून देणे गरजेचे आहे...’ गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केलेल्या या विचारांवर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. मात्र त्यांच्या याच योजनेतून सुराज्य कसे निर्माण होऊ शकते हे मराठी चित्रपटातून दाखविण्याचा विडा दिग्दर्शक संतोष मांजरेकर याने उचलला आहे. ‘सुराज्य’ या नावानेच या चित्रपटाची निर्मिती पूर्ण झाली असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
2009 मध्ये ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करून संतोष मांजरेकर सर्वप्रथम प्रेक्षकांसमोर आला होता. आता पाच वर्षानंतर तो पु्न्हा ‘सुराज्य’ घेऊन येत आहे. ‘दिव्य मराठी’शी बोलताना संतोषने सांगितले, देशात मठ, देवळांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. गरीब नाडलेल्या जनतेला भुलवून कोट्यवधी रुपये मठाधिपती आणि मंदिरांचे विश्वस्त जमा करतात. खरे तर हा पैसा जनतेच्या भल्यासाठी म्हणजेच त्यांच्या प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी वापरला पाहिजे. देशभरातील मंदिर, मठ, चर्च, मशिदींमध्ये कोट्यवधींचा निधी पडून आहे. हा निधी बाहेर काढून प्राथमिक सोयी सुविधा म्हणजेच शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पक्की घरे देता येऊ शकतात. मात्र असे कोणी करीत नाही. मी माझ्या चित्रपटात हीच कथा मांडली आहे. मोदींच्या वक्तव्यानंतर कल्पना सुचली का, या प्रश्नावर संतोष म्हणाला, नाही. त्यापूर्वीच मी चित्रपटाला सुरुवात केली होती. परंतु मोदींची ही विचारसरणी चित्रपटात आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सुराज्य’चा मोदींना फायदा होईल का?,’
या प्रश्नावर संतोष म्हणाला, मी एक विचार मांडला आहे. त्याचा कोणता पक्ष कसा फायदा घेतो ते मी कसे सांगू शकेन? मी राजकीय पक्षासाठी नव्हे तर जनतेसाठी चित्रपट निर्मिती करतो. ‘शिवाजीराजे’मुळे मराठी माणसांमध्ये एक जागृती आली होती. या चित्रपटानेही एक वेगळी जागृती निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.
वैभव, मृणालची जोडी
या चित्रपटात वैभव तत्त्ववादी, मृणाल ठाकूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. अन्य भूमिकांमध्ये डॉ. श्रीराम पत्की, विनायक भावे, माधव अभ्यंकर आणि शरद पोंक्षे आहेत. चित्रपटाची कथा विनायक प्रभू यांची असून पटकथा सौरभ भावे आणि संतोष मांजरेकर यांनी लिहिली आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश राव आणि सोनाली मांजरेकर यांनी केली आहे.