आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Government May Rename Bombay, Madras High Courts

\'बॉम्बे\'ऐवजी मुंबई हायकोर्ट नामकरणास केंद्र सरकार राजी, राज्याने पाठवला प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘बॉम्बे हायकोर्टा’चे ‘मुंबई उच्च न्यायालय’ असे नामांतर लवकरच आपणाला दिसू शकणार आहे. मागील महिन्यात शिवसेनेने बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई असे नामकरण करण्याची मागणी केल्यानंतर भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. त्यानुसार नविन विधेयक तयार करण्याच्या जोरदार हालचाली केंद्रीय विधी मंत्रालयात सुरू झाल्या आहेत. याचबरोबर मद्रास हायकोर्टाचे ‘चेन्नई उच्च न्यायालय’ असे नामकरण करण्यात येणार आहे.
मद्रास शहराचे ‘चेन्नई’ असे नामांतर तामीळनाडू सरकारने 1990 साली केले, तर महाराष्ट्र सरकारने 1995 साली ‘बॉम्बे’चे नामकरण ‘मुंबई’ असे केले. पण त्यानंतरही चेन्नई आणि मुंबई या शहरांतील न्यायालयांची नावे ‘मद्रास हायकोर्ट’ आणि ‘बॉम्बे हायकोर्ट’ अशीच राहिलेली होती. त्यामुळे शहरांच्या नावांनुसार त्या न्यायालयांचे नामकरण करण्याची जोरदार मागणी होत होती. अखेर केंद्र सरकारने त्याची दखल घेतली असून आता त्यादृष्टीने पावले उचलली आहेत.

ब्रिटिश राजवटीत स्थापन झालेल्या तीन न्यायालयांमध्ये कलकत्ता हायकोर्ट हे पहिले ठरले. ते 1 जुलै 1862 रोजी सुरू झाले, तर मद्रास हायकोर्ट आणि बॉम्बे हायकोर्ट ही दोन्ही न्यायालये नंतर सुरू झाली. बॉम्बे हायकोर्ट हे 14 ऑगस्ट 1862 रोजी सुरू झाले होते. पश्‍चिम बंगालमधील कलकत्ता शहराचे नामकरण तेथील सरकारने ‘कोलकाता’ असे केले आहे. त्यामुळे कलकत्ता हायकोर्टाचे नामकरण ‘कोलकाता हायकोर्ट’ असे करण्याची मागणीही सतत होत आहे.