आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Government News In Maharashtra Congress

मोदींसाठी २१ प्रश्नांचे मोदक, केंद्र सरकारवर काँग्रेसने केला प्रश्नांचा भडिमार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेऊन तीन महिने उलटले असताना आणि लवकरच त्यांच्या कार्यकाळास शंभर दिवस पूर्ण होणार असताना काँग्रेसने त्यांच्यावर २१ प्रश्नांची तोफ डागली आहे. माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांच्याविरुद्ध न्यायालयात केंद्र सरकारने स्वत:च शपथपत्र सादर केले आहे, अशा परिस्थितीत त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून अद्याप हकालपट्टी का केली नाही? असा प्रश्नही काँग्रेसने िवचारला आहे.

गणेशोत्सवात बाप्पाला २१ मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो तसे मोदींसाठी हे २१ प्रश्नांचे मोदक आम्ही पाठवत आहोत, अशी मिश्किल टिप्पणी करीत काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार अनंत गाडगीळ यांनी मोदी सरकारवर हल्ला चढविला.

मोदींनी सत्तेत येताच घटनात्मक पदांची अवहेलना चालविली असल्याची टीकाही काँग्रेसने केली आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमास गैरहजर राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे पंतप्रधान स्वत: मात्र राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीवर बहिष्कार घालतात. ही देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीची अवहेलना नाही का?,असा प्रश्नही काँग्रेसने विचारला. भाजपशािसत मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा आणि गुजरात या राज्यांमधील मंत्र्यांच्या कारभारावरूनही काँग्रेसने मोदी व भाजपवर चांगलाच हल्ला चढवला.

व्हीके, स्मृतींचे काय?
>लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी म्हणायचे ‘यूपीए’ने गेल्या १० वर्षात देशाची वाट लावली. त्याच मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर भूतानला भेट देऊन भाषण केले की, भारताने गेल्या १० वर्षात नेत्रदीपक प्रगती केली. मग कोणते मोदी खरे समजायचे?

>चिनी सैन्य ३० किलोमीटर आत घुसले तरी संरक्षणमंत्र्यांना समजले नाही. हीच का पार्टटाइम संरक्षण मंत्र्यांची तत्परता?

>केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री व्ही.के. सिंह यांच्याविरुद्ध केंद्र सरकार न्यायालयात शपथपत्र देते. त्याच व्ही. के. सिंह यांचा राजीनामा का घेतला जात नाही?’' अशा प्रश्नांचा भडिमारच गाडगीळ यांनी केला
.
>२००४ च्या निवडणुकीत आपण बी.ए. तर २०१४ च्या निवडणुकीत बी. कॉम. झाल्याचे सांगणाऱ्या स्मृती इराणींविरुद्ध अजून कारवाई का नाही?

मेणबत्त्या कधी लावणार?
नवी दिल्लीत झालेल्या निर्भया कांडानंतर भाजपही रस्त्यावर उतरली होती. महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी राज्यातील २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यास ‘छोटी’ घटना संबोधल्यानंतर भाजपने त्यांचा राजीनामा मालितला होता. आता दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणास जेटली हे ‘छोटी घटना’ संबोधत असताना जेटलींच्या घरासमोर सुषमा स्वराज, हेमामालिनी व स्मृती इराणी कधी मेणबत्त्या लावणार, असा खोचक प्रश्न विचारत गाडगीळ यांनी भाजपला विचारला.