आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- राजकारणात अनेक नेत्यांना विकासाची दृष्टी नसते. मात्र देशात सध्या दूरदृष्टी असलेला नरेंद्र मोदी हे एकमेव नेते आहेत, अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मोदींची प्रशंसा केली. मंगळवारी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या त्रिदशकपूर्ती महोत्सवात ते बोलत होते. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि संघाचे कार्यवाह भय्याजी जोशी यांची उपस्थिती होती.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी असल्याने दुस-या टर्मसाठी तयार असलेल्या नितीन गडकरी यांनी केलेल्या मोदींच्या या प्रशंसेला विशेष महत्त्व आहे. मोदी आणि गडकरी यांच्यात बेबनाव असल्याचे सर्वश्रुत असताना गडकरींनी केलेली स्तुती ही निवडणुकीपूर्वीर्ची साखरपेरणी असल्याची चर्चा आहे.
गडकरी म्हणाले की, मोदींचे प्रशासन कौशल्य आणि विकसनशील नेतृत्व वाखाखण्यासारखे आहे. त्यांंच्यासारखा नेता सध्या कोणी दिसत नाही. म्हाळगी प्रबोधिनीने गेल्या तीन दशकांत पुढील पन्नास वर्षांचा विचार करणारे नेते दिलेत. प्रबोधिनीच्या शिक्षणामुळेच मुंबई -पुणे हायवे हा चार लेनचा रस्ता आपण सोळा लेनचा केला.
संघात राष्ट्रप्रेमाचे धडे : अडवाणी
अडवाणी म्हणाले की, संघामुळे आपण शिस्त समाजकारण आणि राजकारण शिकलो. संघ ही चांगले संस्कार करणारी संघटना आहे. संघाच्या प्रशिक्षणामुळे नेत्यांना आपोआप राष्ट्रप्रेम आणि शिस्त यांचे धडे मिळतात, सध्याच्या नेत्यांमध्ये या गोष्टी दिसत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
निवडणुकांशी संबंध नाही : संघ
भाजपच्या निवडणुका पक्षांतर्गत असल्याने त्याबाबत निर्णय पक्षच घेऊ शकतो संघाचे मत व्यक्त करता येणार नाही, असे संघाचे कार्यवाह भय्याजी जोशी यांनी सांगितले. या कार्यक्रमापूर्वी अडवाणी, गडकरी, भय्याजी जोशी, विनोद तावडे, विनय सहस्रबुद्धे यांच्यात गोपनीय बैठक झाली.
आकसाने नाव गोवण्याचा आयकराचा डाव : गडकरी
आयकर विभाग आकसापोटी ‘पूर्ती उद्योगा’चे नाव गोवत असल्याचा आरोप नितीन गडकरी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे. दिल्लीत बसलेल्या नेत्यांच्या इशा-या वर आयकर विभागाने सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे. पूर्ती उद्योग समूहाच्याबाबतीत सर्व माहिती आपण दिली आहे. आपल्या कुटुंबानेही विभागाला सहकार्य केले आहे त्यामुळे काहीही लपवले नसताना ही कारवाई अनाकलनीय असल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.