आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Is Responsible For The Lost Of Delhi Assembly Election Says Raj Thackeray

दिल्लीतील भाजपचा पराभव नरेंद्र मोदीमुळेच- राज ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिल्लीतील भाजपला झालेला पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच झाल्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे. एखाद्या संघाला, संघटनेला जो व्यक्ती लीड करीत असतो त्याच्यावरच चांगल्या- वाईट गोष्टीची अंतिम जबाबदारी जाते असे सांगत राज यांनी पंतप्रधान मोदींना दिल्लीतील भाजपच्या दारूण पराभवाला जबाबदार धरले.
दिल्लीत भाजपचा दारूण पराभव झाला. दिल्ली विधानसभेत 70 जागा आहेत. यात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने तब्बल 67 जागा खेचून आणल्या. तर भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या. काँग्रेस खातेही खोलू शकले नाही. काँग्रेस या निवडणुकीत रेसमध्येच नव्हती त्यामुळे त्यांच्या पराभवाबाबत मिडियासह विविध राजकीय नेत्यांसह काँग्रेस नेत्यांनाही आश्चर्य वाटले आहे. मात्र, केंद्रात भाजप सत्तेवर असल्याने भाजप चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्याचे कारण म्हणजे भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह बड्या नेत्यांच्या 300 पेक्षा जास्त सभा दिल्लीत घेतल्या. याचबरोबर पक्षाचे सर्व खासदारांना प्रचारात जुंपून हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भाजपचे देशभरातील कार्यकर्ते दिल्लीत येऊन पक्षाचा प्रचार करीत होते. एवढेच नव्हे तर केजरीवालांना टफ देण्यासाठी त्यांच्याच एकेकाळच्या सहकारी किरण बेदींना उतरवून केजरीवालांना पराजित करण्याचा चंग अमित शहा व मोदींनी बांधला होता. त्यामुळेच साम, धाम, दंड या सर्व आयुधांचा वापर करूनही दिल्लीकर जनतेने भाजपला साफ नाकारले. त्यामुळे भाजपला केवळ 3 जागांवर यश मिळवता आले. हाच संदर्भ देत राज ठाकरे यांनी दिल्लीतील भाजपच्या पराभवाला नरेंद्र मोदी हेच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.