आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - आजपर्यंत तुम्ही काँग्रेसला मत देत आला आहात. परंतु काँग्रेस सरकारने केवळ ‘व्होट बँकेचे’ राजकारण केले. आता भ्रष्टाचार, कुशासन आणि महागाईला मूठमाती देऊन विकासाचे राजकारण करण्यासाठी ‘पक्षाला नको, देशाला मत द्या’, असे आवाहन करत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ‘व्होट फॉर इंडिया’चा नवा नारा येथील विशाल महागर्जना रॅलीमध्ये दिला.
वांद्रे येथील बीकेसी मैदानावर राज्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या 3 लाखांहून अधिक कार्यकर्त्यांच्या साक्षीने रविवारी भाजपची बहुचर्चित महागर्जना रॅली पार पडली. यात मोदींनी काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला. ‘भारतातील समस्यांचे मूळ येथील इतिहास, भूगोल किंवा नैसर्गिक साधनांच्या अपुरेपणात नसून काँग्रेस सरकारच्या राजवटीत दडलेले आहे. देशातील समस्या सोडवायच्या असतील तर देश काँग्रेसमुक्त झाला पाहिजे’, असे सांगत ‘भारत छोडो’ सारखी चळवळ काँग्रेसविरोधात उभारण्याची गरज मोदी यांनी प्रतिपादित केली. त्याशिवाय जनतेला आता दुसरा पर्याय राहिला नसल्याचे मोदी यांनी ठासून सांगितले.
पुढील स्लाइडमध्ये, अल्पसंख्यांकांचे भूत काँग्रेसची देण
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.