आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, BJP, Vidarbh Visit, Hailstorm, Divya

नरेंद्र मोदी उद्या विदर्भात, वर्ध्‍यात होणार जाहीर सभा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमदेवार नरेंद्र मोदी गुरुवारी (20 मार्च) विदर्भाच्या दौ-यावर येत असून वर्ध्यात त्यांची जाहीर सभा होणार आहे. सभेनंतर ते सायंकाळी पाच वाजता यवतमाळ जिल्ह्याच्या अर्णी तालुक्यातील दाभडी या गावी गारपीटग्रस्त शेतीची पाहणी करून संकटग्रस्त शेतक-यांशी तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधतील.


वर्धा येथे गुरुवारी दुपारी 2 वाजता मोदींची सभा होत असून या सभेला भाजपचे माजी राष्‍ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


वर्ध्याच्या सभेसाठी महायुतीचे विदर्भातील सर्व उमेदवार उपस्थित राहणार आहेत. यात रामदास तडस (वर्धा, भाजप), हंसराज अहिर (चंद्रपूर, भाजप), भावना गवळी (यवतमाळ, वाशीम, शिवसेना), प्रतापराव जाधव (बुलडाणा, शिवसेना), संजय धोत्रे (अकोला, भाजप), कृपाल तुमाने (रामटेक, शिवसेना), नाना पटोले (भंडारा, गोंदिया, भाजप), अशोक नेते (गडचिरोली, भाजप) व नितीन गडकरी (नागपूर, भाजप) यांचा समावेश आहे.