आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Shares Stage With Lata Mangeshkar In Mumbai

याद करो कुर्बानी.. 51 वर्षांनी भारावली मने, लतादीदींसह एक लाख लोकांनी गायले गीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘ऐ मेरे वतन के लोगों..जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी..’ देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या ज्या अमर गीताने तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात पाणी आले त्या ओळी सोमवारी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या तोंडून बाहेर पडल्या आणि लाखोंच्या जनसमुदायानेही त्यांना साथ दिली. निमित्त होते कवी प्रदीप यांनी लिहिलेल्या आणि 27 जानेवारी 1963 रोजी लतादीदींनी गायिलेल्या या गीताच्या सुवर्णमहोत्सवाचे.

शहीद गौरव समिती व लोढा फाउंडेशनच्या वतीने मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर हा कार्यक्रम झाला. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी या वेळी लतादीदींचा सत्कार केला.

उद्धवची नाराजी : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण होते, मात्र मोदींना दिले जात असलेले महत्त्व पाहून उद्धव यांनी ऐनवेळी जाणे टाळले. निमंत्रणपत्रिका, पोस्टर्स आणि होर्डिंगवर कुठेही उद्धव यांच्या फोटोला स्थान नव्हते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या ट्विटरवर लतादीदींनी काय म्हटले...