आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi To Hold Public Rally In Maharashtra Today

शिवाजी महाराजांना केवळ युद्धात अडकवणे चुकीचे - नरेंद्र मोदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई / रायगड - गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी रायगडावर दाखल झाले आहेत. आज (रविवार) सकाळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केले. त्यानंतर रायगडावर आयोजित छोटेखानी सभेला त्यांनी संबोधित केले. यावेळी मोदींनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला.
शिवाजी महाराजांचे कार्य फार मोठे होते. त्यांना केवळ युद्धामध्ये अडकवण चुकीचे असल्याचे मोदी म्हणाले. शिवाजी महाराजांनी सुरतवर केलेला हल्ला आणि इतिहासात त्याची सुरतेची लूट हे चुकीचे इतिहास लेखन असल्याचे ते म्हणाले.
मोदींनी भाषणाची सुरवात शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने केली. यावेळी मंचावर भाजप नेते विनोद तावडे, संभाजी भिडे उपस्थित होते.
सांगलीच्या संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मोदी येणार असल्याचे कळताच रायगडावर शनिवारपासूनच नागरिक जमा होण्यास सुरूवात झाली होती. शनिवारी सुमारे 10 हजार लोक जमा झाले होते. आजच्या त्यांच्या सभेला मोठी गर्दी होणार हे लक्ष्यात घेऊन कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शिवाजी महाराजांच्या रायगडावर मोदींचा कार्यक्रम व्हावा हे दुर्दैवी असल्याचे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. पुढील स्लाइडवर वाचा, काय म्हणाले सचिन सावंत