आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Narendra Modi To Take Efforts For Bringing Thackeray Brothers Together

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज-उद्धव ठाकरेंना नरेंद्र मोदी आणणार एकत्र, मुंडेंनी फेटाळली शक्‍यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी एक मोठी राजकीय कामगिरी बजावणार आहेत. त्‍यात ते यशस्‍वी झाल्‍यास महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात मोठे परिवर्तन घडू शकते. हे काम म्‍हणजे, उद्धव आणि राज ठाकरे यांच्‍यातील दरी दूर करण्‍याचे. दोन्‍ही भावांमधील दरी दूर करुन विशालयुतीसाठी मोदी प्रयत्‍न करणार आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनीही महाराष्‍ट्रात विशालयुती स्‍थापन करण्‍यासाठी पक्ष प्रयत्‍नशील असल्‍याचे सांगून या वृत्ताला एक प्रकारे दुजोरा दिला आहे. मात्र, ज्‍येष्‍ठ नेते गोपीनाथ मुंडेंनी हे वृत्त फेटाळले आहे. मोदी किंवा भाजपचा कोणताही नेता या दृष्‍टीने प्रयत्‍न करीत नसल्‍याचे मुंडेंनी स्‍पष्‍ट केले आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे या दोन भावांमध्‍ये मोठी दरी आहे. उद्धव ठाकरे यांनी राज यांना काही महिन्‍यांपूर्वी टाळी दिली होती. परंतु, राज यांनी त्‍यास प्रतिसाद दिला नाही. तरीही भाजपचे अनेक नेते राज ठाकरेंचे मन वळविण्‍यासाठी प्रयत्‍न करत होते. अखेर त्‍यांनीही दोन भावांना एकत्र आणण्‍याचा नाद सोडला. आता नरेंद्र मोदी हा प्रयत्‍न करणार आहेत. राज्‍यात कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सरकार पाडण्‍यासाठी दोन्‍ही भावांनी एकत्र येणे आवश्‍यक आहे, हे मोदी चांगलेच ओळखून आहेत. त्‍यामुळेच त्‍यांनी हा अजेंडा हाती घेतला आहे. दोघांनी एकत्र कसे आणता येईल, याबाबत त्‍यांनी महाराष्‍ट्रातील भाजप नेत्‍यांसोबत चर्चाही केली. भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज आणि उद्धव यांच्‍यासोबत गेल्‍या दोन महिन्‍यांमध्‍ये 3-4 बैठका केल्‍या.