आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi's Diwali Gift Bye NCP Congress Maharashtra

नरेंद्र मोदींना राष्ट्रवादीची ‘दिवाळभेट’; इतिहासाच्या आठ ग्रंथ अहमदाबादला पाठवणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बुधवारी राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी इतिहासाच्या आठ पुस्तकांचा संच दिवाळीची भेट म्हणून अहमदाबादला पाठवला.

बिहारमधील पाटणा येथील सभेत मोदी यांनी इतिहासाचे चुकीचे दाखले दिले होते. त्यावर आव्हाड म्हणाले, मोदींचा इतिहास बराच कच्चा आहे. त्यांनी इतिहासाचे अध्ययन करावे आणि खरा इतिहास देशासमोर मांडावा. यासाठी इतिहासाच्या आठ पुस्तकांचा संच त्यांना पाठवत आहे.

भारतीय इतिहासात ज्यांची नावे सुवर्णाक्षरांनी लिहिली आहेत. त्यांच्या चरित्रांशी मोदी छेडछाड करत आहेत. भारतीयांच्या मनांत इतिहासाविषयी अपार आदर आहे. मात्र, मोदींचा इतिहास कच्चा असल्याचा टोला आव्हाड यांनी लगावला.

भाजप आणि संघ परिवार यांच्याकडे एकही उत्तुंग नेता नाही. त्यामुळे मोदी यांना पुन: पुन्हा पंडित नेहरू आणि सरदार पटेल या काँग्रेसी नेत्यांची नावे घ्यावी लागतात, असे स्पष्ट करत ज्या व्यक्तीला इतिहास माहीत नाही, तो कधीच इतिहास घडवू शकणार नाही, असेही आव्हाड म्हणाले.

ही आहेत पुस्तके?
आर. एस.शर्मा, बिपीन चंद्र, डी. एन. झा. या प्रख्यात इतिहासकारांच्या ग्रंथाचा भेटीच्या संचात समावेश आहे. त्यासोबत पंडित नेहरू यांचे ‘शोध भारताचा’ तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांनी गोळवलकर गुरुजी आणि शामाप्रसाद मुखर्जी यांना पाठवलेल्या पत्रांच्या संचाचा आठ पुस्तकांमध्ये समावेश आहे.