आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील टॉप टुरिस्ट ठिकाणांत नाशिकसह पाच भारतीय शहरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - खर्चाच्या दृष्टिकोनातून पर्यटकांना अनुकूल असणार्‍या जगातील 100 पर्यटन स्थळांच्या यादीत भारतातील पाच शहरांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यात महाराष्ट्रातील अलिबाग शहराचाही समावेश आहे. बेस्ट व्हॅल्यू इंडेक्स शहरांच्या यादीत नाशिक 21 व्या स्थानी असून येथे एक रात्र घालवण्यासाठीचा खर्च 5 हजार 665 रुपये इतका असू शकतो, असे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. नाशिक शहराला या वर्षी देशातील सर्वर्शेष्ठ पर्यटन अनुकूल शहर म्हणूनही स्थान मिळाले आहे. या यादीत वरकाला हा केरळचा समुद्रकिनारा 28 व्या स्थानी असून राजस्थानातील जैसलमेरला 41 वे स्थान, अलिबागला 56 वे स्थान, तर केरळातील मुन्नारला 60 वे स्थान मिळाले आहे. ऑनलाइन हॉटेल सर्च वेबसाइट ट्रायवेगोने हे सर्वेक्षण केले. त्यासाठी त्यांनी 8.2 कोटी प्रवाशांनी भेट दिलेल्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून त्या आधारे शंभर पर्यटन ठिकाणांची यादी केली. त्यात ही शहरे पर्यटकांच्या विशेष पसंतीला उतरली.