आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या उद्याेगांनाही वीज बिल सवलती, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील डी आणि डी प्लस झोनमधील उद्योगांनाही विदर्भ व मराठवाड्याप्रमाणे आवश्यक त्या सर्व वीज सवलती दिल्या जातील, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिले.

राष्ट्रवादीचे जयवंतराव जाधव यांनी मांडलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. राज्यातली ७० टक्के वीज विदर्भ व मराठवाड्यात तयार होते; पण त्याचा बहुतांशी वापर कोकण व पश्चिम महाराष्ट्रात होतो. कोकणात ११,३२४, पश्चिम महाराष्ट्रात १० हजार, मराठवाड्यात ३,३४७ तर विदर्भात ३,८४८ दशलक्ष युनिट वीज वापरली जाते. ज्या भागातून पाणी, वीज, जमीन वापरली जाते त्यांना याचा उपयोग व्हावा, या भागात उद्योजकांनी आकृष्ट व्हावे म्हणून तेथील उद्योगांना वीजदरात ३० टक्क्यांची सवलत देण्याचा निर्णय घेतला, असे ऊर्जामंत्री म्हणाले.
समान न्याय : िवदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना वीज सवलत देण्यासाठी हजार कोटींची तरतूद केली आहे. त्याचे कारण अनुशेष आहे. मात्र या भागात येण्यासाठी सरकार उद्योजकांना लालूच दाखवणार नाही. यापूर्वीचे सरकार वस्त्रोद्योगास जी हजार कोटींची सबसिडी देत असे, त्यातला एक पैसाही िवदर्भ- मराठवाड्यात िमळत नव्हता, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.