आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nashik Satana College Gurakha Attack News In Marathi, Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुरख्याचा महाविद्यालयात थरार; प्राचार्य, प्राध्यापकांसह चौघांवर कुर्‍हाडीने हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सटाणा (जि. नाशिक)- ‘मुझे ऑर्डर क्यूं नहीं देते’, ‘सब को मार डालुंगा’, असे ओरडत कॉलेजच्या गुरख्याने प्राचार्यासह दोन प्राध्यापक व शिपायावर कुर्‍हाडीने हल्ला केला. यात शिपायाचा मृत्यू झाला. प्राध्यापकांची प्रकृती गंभीर आहे. ना.म. सोनवणे कॉलेजातच गुरुवारी सकाळी ही घटना घडली.

कॉलेजात 8 वर्षांपासून गुरखा असलेला बलराम गंगाराम पाल पत्नी हिरादेवी व मुलगी मंजुर्शी यांना घेऊन घराबाहेर पडला. कॉलेजच्या आवारात त्याने प्रा. प्रफुल्ल ठाकरे व सुनील सागर यांच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घातले. प्राचार्यांच्या केबिनजवळ शिपाई दादाजी छबू मगरे यांच्यावरही हल्ला केला. यात मगरे यांचा मृत्यू झाला. विद्यार्थ्यांनी पकडल्यानंतर बलरामला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेमुळे कॉलेजात एकच पळापळ सुरू होती. विद्यार्थ्यांनाही सुटी देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी पकडले : हल्ला करून पळून जाण्याच्या बेतात असलेल्या बलरामला सतीश रौंदळ, पंकज बोरसे व हेमंत देवरे या विद्यार्थ्यांनी शिताफीने पकडले. त्यामुळे आणखी अनर्थ टळला. तेवढय़ात पोलिस आले व त्यांनी बलरामला ताब्यात घेतले. आरोपी बलराम दोन दिवस रजेवर होता. याच काळात त्याच्या डोक्यात ऑर्डरचे विचार घोळत असावेत आणि त्यातूनच त्याने हे कृत्य केले, अशी चर्चा आहे.

मला पश्चाताप नाही
कायस्वरूपी नेमणुकीची ऑर्डर येऊनही ती दाबून ठेवल्याचे काही कर्मचार्‍यांनी सांगितले. दादाजी मगरे त्यावरून मला नेहमी चिडवायचा. म्हणूनच रागाच्या भरात सबको मार डालुंगा असे म्हणत मी चौघांवर कुर्‍हाडीचे घाव घातले. त्याबद्दल पश्चात्ताप होत नाही.
-बलराम गंगाराम पाल, आरोपी गुरखा