आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचे \'वाघ\' म्‍हणाले, मनसे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, घेतला शिवसेनेत प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक / मुंबई - ‘नाशिकमध्ये मनसे ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे,’ असा आरोप करत माजी महापाैर अॅड. यतिन वाघ, नगरसेवक रमेश धोंगडे आणि अरविंद शेळके यांनी साेमवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून या तिघांचेही पक्षात स्वागत केले.

राज्यात एकमेव महापालिका ताब्यात असलेल्या नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये गेल्या काही दिवसापांसून पक्षांतर्गत खदखद सुरू अाहे. यातूनच मनसेचे काही नगरसेवक भाजप अाणि शिवसेना या दाेन पक्षांची चाचपणी करत असल्याची चर्चा हाेती. भाजपमध्ये प्रवेश करण्याची काहींनी तयारीही केली हाेती. परंतु अंतर्गत राजकारणामुळे हा प्रवेश साेहळा लांबणीवर पडला.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली हाेती. परंतु त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे या प्रवेश साेहळ्याने स्पष्ट केले. मनसेचे पहिले महापाैर अॅड. यतिन वाघ हे काही महिन्यांपासून मनसेला साेडचिठ्ठी देण्याच्या तयारीत हाेते. पश्चिम प्रभाग समितीच्या निवडणुकीत तर त्यांनी भाजपकडे काैल दिला हाेता.
मनसेत गटबाजी वाढली : वाघ
‘संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांनी मनसेत गटबाजी वाढवली. पक्ष स्थापनेपासूनच अाम्ही तन, मन, धनाने काम केले. परंतु गेल्या काही महिन्यांपासून पक्ष धाेरणांपासून लांब जात झाल्याचे दिसत अाहे. मनसेत स्थानिक पातळीवर कंपू तयार झाला अाहे. हा कंपू अाम्हाला राज ठाकरे यांच्यापर्यंत पाेहोचू देत नव्हता’, अशी प्रतिक्रिया यतिन वाघ यांनी दिली.