आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: मराठा युवकांसाठीच्या ‘सारथी’ला सहा महिन्यांनंतरही वेग येईना!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आरक्षणासाठी गेले वर्षभर लढा देणाऱ्या मराठा समाजाचा रोष शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात ‘सारथी’ या संस्थेची घोषणा केली. अनुसूचित जातींच्या युवकांसाठी उभारण्यात आलेल्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या (बार्टी) धर्तीवर ‘सारथी’ची (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्था) उभारणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला खरा, पण सहा महिने झाले तरी या संस्थेच्या कामाला अजूनही वेग आलेला नाही.  

शिक्षण, नोकरीत आरक्षण याेग्य स्थान नसल्याने  मराठा युवकांची फरपट होत असून यामुळे निराश झालेल्या या युवकांनी हजारोंच्या संख्येने माेर्चे काढून संताप व्यक्त केला हाेता. या पार्श्वभूमीवर मराठा युवकांना एका संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी दिशा मिळेल, अशा हेतूने ‘सारथी’ची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सामाजिक न्याय विभागाचा कारभार पाहता ‘सारथी’च्या रथाची चाके पुढे सरकतच नसल्याचे दिसून आले आहे.
  
‘सारथी’ची मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली होती. त्यात भारतीय वनसेवा अधिकारी (निवृत्त) डी.आर.परिहार यांचाही समावेश होता. या समितीच्या घोषणेचा शासन निर्णय ३ जानेवारी काढण्यात आला. मात्र या समितीला काम करण्यासाठी जागा मिळवून देणे, आवश्यक मनुष्यबळ पुरवणे, संगणक सुविधा व आवश्यक रूपरेषा निश्चित करणे तसेच समितीला कालावधी निश्चित करण्यासाठी अाणि त्याचा अध्याधेक्ष काढण्यासाठी सामाजिक न्याय वभागाला सहा महिने लागले. शेवटी ५ जुलैला हा अध्याधेश काढण्यात आला. समितीत तिला ध्येय धोरणे निश्चित करण्यासाठी ३ महिन्यांचा अवधी देण्यात आलेला आहे. मात्र त्यासाठी कामकाजाचे ठिकाण कुठे असेल याविषयी काही माहिती देण्यात आलेली नाही. कालावधी निश्चित झाला असला तरी बाकीच्या काहीएक सुविधा नसल्याने समिती काम तरी कसे करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  

मराठा युवकांच्या पदरीनिराशाच :  बाळासाहेब सराटे  
‘मराठा मोर्चाच्या रेट्यामुळे सरकारने सारथी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पण अद्याप ते पुढे सरकत नसल्याने मराठा युवकांच्या पदरी निराशा आली आहे. सामाजिक न्याय विभाग असो किंवा आताचे ओबीसी मंत्रालय या दोन्ही ठिकाणी मराठा समाजाचा विचार करणारे कोणीही नसल्याने सरकारने कितीही निर्णय घेतले तरी त्याचा पाठपुरावा होताना दिसत नाही’, अशी प्रतिक्रिया मराठा समाजाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी व्यक्त केली.  

आमचे काम सुरू आहे :  सदानंद मोरे  
सारथीला जागा नसली तरी आमचे काम सुरू अाहे.  मी अाणि परिहार बैठका घेऊन कामाचे स्वरूप निश्चित करत आहोत. आमची समिती संकल्पित आराखडा तयार करण्याचे काम करणार आहे. पुढे या आराखड्याचे काय करायचे हा सरकारचा निर्णय आहे. सरकार उदासीन दिसत आहे, याविषयी मी काही बोलणार नाही, असे मत समितीचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...