आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nathuram Godse\'s Niece Himani Sawarkar Opposed Hindu Mahasabha Decision

नथुरामच्या पुतळ्याला नातेवाईकांचाच विरोध, प्रतिमा मलिन होतेय -हिमानी सावरकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- हिंदू महासभा द्वारे महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे देशभरातील काही शहरांत पुतळे उभारण्यास खुद्द गोडसेची पुतणी हिमानी सावरकर यांनी विरोध केला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, हिमानी सावरकर यांनी नथुरामचे असे देशात पुतळे लावण्यास विरोध केला आहे. असे पुतळे उभारले गेल्यास नथुराम गोडसेच्या प्रतिमेबाबत चुकीचा संदेश जात आहे. गांधींचा मारेकरी म्हणून नथुराम याची आधीच प्रतिमा मलिन केली जात आहे. अशा स्थितीत पुतळे उभारले गेल्यास त्याचा परिणाम वाढेल. हिमानी सावरकर सध्या पुण्यात राहतात. उजव्या विचारसरणीच्या कट्टर समर्थक असलेल्या हिमानी 'अभिनव भारत' संघटना चालवतात. हिमानी ही गोपाल गोडसे यांची मुलगी आहे. गोपाळ गोडसे हे नथुरामचे छोटे भाऊ होते.

नथुरामची प्रतिमा मलिन होत आहे- 'इकॉनॉमिक टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत 67 वर्षीय हिमानी यांनी म्हटले आहे की, 'सरकारने अधिक महत्त्वाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे. अशा गोष्टीमुळे गोडसेची प्रतिमा एक चलाक मारेकरी किंवा दहशतवादी बनत चालली आहे जी मूळात नाही'. हिमानी यांचे लग्न विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतण्याशी झाले आहे. खुद्द सावरकर हे 30 जानेवारी 1948 रोजी झालेल्या महात्मा गांधींच्या हत्येप्रकरणी आरोपी होते. नंतर मात्र त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
गोडसे देशभक्त होते- हिमानी यांनी सांगितले की, पुतळे उभे करण्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक चुकीचे बोलत आहेत ज्यामुळे नथुरामबाबत लोकांच्या मनात नकारात्मक भावना तयार होत आहे. नथुराम देशभक्त होते त्यांनी जे काही केले त्याबाबत त्यांना शिक्षा हवी होती. ते वेडे नव्हते की सुपारी किलर नव्हते.

हिमानींच्या संघटनेवर दहशतवाद पसरविल्याचा आरोप- मुलाखतीत पुढे म्हटले आहे की, "गांधींजीना मारण्यामागे नथुरामचे विचार आणि कारण समजून घेतल्यास ते लोक देशाचा इतिहास बदलू शकतात. देशाने नथुरामबाबत जाणून घेतले पाहिजे मात्र अशा पुतळे उभारण्याच्या वादाने नव्हे. काँग्रेसने ब्राह्मणांना बदनाम करण्यासाठी सतत नथुराम गोडसेंचे नाव वापरले आहे.' हिमानी सावकर यांच्या 'अभिनव भारत' या हिंदुत्त्ववादी संघटनेवर महाराष्ट्रात बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोप लागला आहे. नथुराम गोडसे पुतळा प्रकरणावरून संसद बंद पाडणा-या विरोधी पक्षांवर हिमानी यांनी टीका केली आहे.
पुण्यात आहे नथुरामच्या अस्थीचा कलश- नथुराम गोडसेच्या अस्थियांचा कलश पुण्यात हिमानी सावरकर यांच्या घरी ठेवण्यात आला आहे. हिंदू महासभा गोडसेचा हा अस्थिकलश घेऊन देशभर कलश यात्रा काढणार होती. मात्र, हिमानी यांनी हिंदू महासभेच्या पुतळा बसविण्यालाच विरोध केल्याने या यात्रेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.