आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- दरडवाडी (ता. केज, जि. बीड) येथे 2 ते 4 मार्चदरम्यान तिसर्या राष्ट्रीय भारूड महोत्सवाचे आयोजन केले आहे. देशातील अनेक लोककलावंत या महोत्सवात सादरीकरण करतील.
राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक ज्येष्ठ दिग्दर्शक प्रा. वामन केंद्रे यांनी त्यांचे वडील सुप्रसिद्ध भारूडकार कै. माधवराव केंद्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरडवाडी येथे या महोत्सवाचे आयोजन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून येणार्या भारूड संचांचा ‘स्पर्धात्मक महोत्सव’ होणार असून प्रथम, द्वितीय व तृतीय येणार्या संचास रोख रकमेसह प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. प्रवेश अर्जाची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी असून प्रवेश अर्जामध्ये मंडळाचे नाव, पत्ता, फोन नं. आणि भारुडांचा तपशील पाठवणे आवश्यक आहे. अधिक माहिती मिळवू इच्छिणार्यांनी संयोजक गौरी केंद्रे (9820868628) व अशोक केंद्रे (9920122197, 9167357707) यांच्याशी संपर्क साधावा.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.