आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Health Scheme For Child Starts By Sonia Gandhi On Tommorrow

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाचे उद्या सोनिया गांधी यांच्या हस्ते उद्घाटन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पालघर येथे 6 फेब्रुवारी रोजी कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाचा प्रारंभ होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी व कार्यक्रमाच्या संचालनासाठी 15 विद्यार्थ्यांची टीम तयार करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.
या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य मंत्री गुलामनबी आझाद, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल.

मंत्र्यांचे भाषण रद्द
शेट्टी यांनी सांगितले की, मुलांच्या आरोग्याबाबत योजनेचा कार्यक्रम असल्याने आम्ही काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहोत. मंत्री, अधिकारी नेहमीच भाषणबाजी करत असतात. या वेळी आम्ही मुलांनाच सगळे कार्यक्रम करण्याची संधी देण्याचे ठरवले. सोनिया गांधी यांच्या स्वागतापासून त्यांची ओळख, योजनेची ओळख, आभार प्रदर्शन आणि शिबिरात माहिती देण्यापर्यंत सर्व कामे या मुलांकडेच सोपवण्यात आली आहेत. माझे भाषणही मी रद्द केले आहे. ही सर्व मुले पाचवी ते दहावीमधील असून आदिवासी मुलांचाही यात समावेश आहे.

महाराष्‍ट्र पॅटर्न देशभर
राष्‍ट्री य ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सहा वर्षे वयापर्यंत बालकांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे आणि 6 ते 18 वर्षादरम्यानच्या बालकांची तपासणी शालेय आरोग्य कार्यक्रमांतर्गत केली जात होती. राज्याच्या या अभिनव योजनेचे केंद्र शासनाने कौतुक केले असून त्यात काही बदल करून देशभर ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला राष्‍ट्री य बाल स्वास्थ कार्यक्रम नाव दिले आहे.