आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National Investigation Agency Give Clean Chit To Nine Men In The Inection Of Malegaon Blast

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मालेगाव स्फोटप्रकरणी राष्‍ट्रीय तपास यंत्रणेने नऊ जणांना दिली क्लीन चिट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 2006 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी 9 जणांनी दाखल केलेल्या मुक्तता अर्जावर राष्‍ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) हरकत न घेता त्यांना क्लीन चिट दिली आहे. त्यांच्याविरोधात कुठलेही पुरावे सापडले नसल्याचे स्पष्टीकरणही एनआयएने न्यायालयात दिले.


एटीएसने नुरल सामसूदोहा, शब्बीर मसीउल्लाह, रइस मन्सुरी, डॉ. सलमान फारसी अब्दुल लतीफ आयमी, डॉ. फारूक मघदुमी, मोहंमद शेख, आसिफ खान, मोहंमद अन्सारी आणि अबरार अहमद यांना अटक केली होती. एटीएस आणि सीबीआयला त्यांच्याविरोधात पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे न्यायालयच याप्रकरणी योग्य निर्णय देईल, असे एनआयएने शपथपत्रात नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास एनआयएने हाती घेतल्यानंतर या सर्वांना जामिनावर सोडण्यात आले होते. या स्फोटात हिंदुत्वादी संघटनांचा हात असल्याचा एनआयएचा दावा आहे. तसेच लोकेश शर्मा, धनसिंग, मनोहरसिंग आणि राजेंद्र चौधरी यांना अटक केली. स्वामी असिमानंद यानेही सहभागाची कबुली दिली होती.