आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National School Of Drama Branch In Goregaon Filmcity

गोरेगाव फिल्मसिटीत राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची शाखा होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालय (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा-एनएसडी)च्या प्रशिक्षणाचा कलाकारांना महाराष्ट्रातच लाभ घेता येण्यासाठी मुंबईत या विद्यालयाची शाखा स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू होते. नव्या सरकारकडून योग्य तो प्रस्ताव व उपक्रमाचा आराखडा मिळाल्यास गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये आता एनएसडीची शाखा उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

याआधी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथील पु.ल.देशपांडे अकादमीचा चौथा मजला एनएसडीसाठी मिळवण्याचे संचालक वामन केंद्रे यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, काही कारणाने हा मजला मिळू शकला नाही. आता मात्र एनएसडी छोटेखानी स्वरूपात मुंबईत न आणता विस्तारित पातळीवर उभारण्यासाठी गोरेगाव फिल्मसिटीचा पर्याय निवडला जाण्याची चर्चा आहे. केंद्रे यांना दिल्लीतील एनएसडीत नसलेले कोर्सेस देखील आणाण्याची इच्छा आहे. रवींद्र नाट्यमंदिर येथे सुरू असलेल्या एनएसडीच्या ‘आदिरंगम’ या लोककला सोहळ्यातही त्यांनी नव्या सरकारच्या सहकार्याची वाट पाहत असल्याचे नमूद केले होते.

एनएसडीला द्यावा राष्ट्रीय दर्जा
कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी एनएसडीला राष्ट्रीय दर्जाची मान्यता देण्यात यावी असे आवाहन केले. एनएसडीला ५५ वर्षे पूर्ण होत असण्याच्या पार्श्वभूमीवर खेर यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.