ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गाेविंदराव आदिक कालवश
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गाेविंदराव आदिक यांचे शनिवारी मुंबईत निधन झाल्याचे वृत्त आहे. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. फुफ्फूसात संसर्ग झाल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना बाॅम्बे हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच उपचार सुरू असताना शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवल्याचे वृत्त रात्री उशिरा काही वृत्तवाहिन्यांनी दिले. अहमदनगर जिल्ह्यातील गाेविंदराव आदिक काँग्रेसमध्ये असताना काही काळ त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षदेखील राहिले होते.