आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nationalist Congress Media Sale Ready For The Forthcoming Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची मीडिया सेल सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मीडिया सेलची स्थापना केली आहे. यासाठी 25 जणांची एक खास टीम तयार करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात स्वतंत्र मीडिया सेल तयार करण्याचे निर्देश दिले होते. पक्षाने यापूर्वीच ‘पॅरामिन’ नावाची एक पीआर एजन्सीही नियुक्त केलेली आहे. राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले की, पक्षाचे आमदार खूप चांगली कामे करतात परंतु त्यांची म्हणावी तशी प्रसिद्धी होत नाही. तसेच छोट्या छोट्या गोष्टीही विपरीत पद्धतीने मीडियात मांडल्या जातात. यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. हे थांबवण्यासाठी आणि जनतेत पक्षाची खरी भूमिका आणि कामे पोहोचविणे हे या मीडिया सेलचे प्रमुख काम असणार आहे. या टीममध्ये प्रसिद्धी पत्रके तयार करणारे, फोटोग्राफर आणि व्हिडियोग्राफरचीही नेमणूक करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीलाच खर्‍या अर्थाने गरज : सावंत
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले की, जनमानसात ताकद कमी असल्याने राष्ट्रवादीला खर्‍या अर्थाने मीडिया सेलची आवश्यकता आहे. आमच्या पक्षाला दिल्लीत शरद पवारांची आवश्यकता नसती तर आम्ही राज्यात त्यांच्याशी युती केलीच नसती. आम्ही जर लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढविली तर तर 25 पेक्षा जास्त जागांवर विजय नक्कीच मिळवू, परंतु राष्ट्रवादीबरोबर जात असल्याने आमच्या जागा कमी होत आहेत, असेही सावंत यांनी सांगितले.