आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress News In Marathi, MLAs, Divya Marathi

आठ अपक्ष आमदार आज ‘राष्ट्रवादी’त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काँग्रेसने आपल्या चार सहयोगी अपक्ष आमदारांना पक्षात प्रवेश दिल्याच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्याचे अनुकरण केले आहे. पूर्वाश्रमीच्या बंडखोर आमदारांना आता विधानसभा िनवडणुकीच्या तोंडावर पक्षात घेऊन राष्ट्रवादीने अडचणीच्या काळात पक्षाला बळकटी आणण्याचा प्रयत्न केला आहे. उपमुख्यमंत्री अिजत पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबईत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होत आहे.

मागील आठवड्यात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत चार अपक्ष आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या सर्वांना िवधानसभेची उमेदवारी देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. दुसरीकडे, पक्षातील अनेक दिग्गज नेते भाजप- शिवसेनेत जात असल्याने पडलेले िखंडार बुजवण्यासाठी राष्ट्रवादीनेही आपल्या बंडखाेर आमदारांना पुन्हा पक्षात घेऊन ‘डागडूजी’ करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

हे आहेत आठ आमदार
* दिलीप सोपल (मतदारसंघ- बार्शी, िज. सोलापूर),
* िवलास लांडे (मतदारसंघ- भोसरी, िज. पुणे)
* लक्ष्मण जगताप (मतदारसंघ -िचंचवड),
* मकरंद जाधव (मतदारसंघ-वाई, िज. सातारा)
* रमेश थोरात (मतदारसंघ- दौंड, िज. पुणे)
* रवी राणा (मतदारसंघ- बडनेरा, िज. अमरावती)
* बाळासाहेब पाटील (मतदारसंघ - उत्तर कराड)
* साहेबराव पाटील (मतदारसंघ - अंमळनेर)
> यापैकी लक्ष्मण जगताप यांनी लाेकसभा िनवडणुकीतही मावळमधून राष्ट्रवादीच्यािवराेधात बंडखाेरी केली हाेती. त्यामुळेच िनवडणुकीच्या ताेंडावर शिवसेनेतून येऊन राष्ट्रवादीची उमेदवारी िमळवलेले राहूल नार्वेकर यांचा पराभव झाला हाेता.
पण, ितकीटाचे काय ? : काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या चारही अपक्षांना ितकीट देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. तसेच आश्वासन राष्ट्रवादी देईल का? याबाबत पक्षप्रवेश करणाऱ्या आमदारांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता आहे.

पूर्वीचे बंडखोर :
हे आमदार अपक्ष आहेत ते केवळ तांत्रीकदृष्ट्या. कारण मागच्या िनवडणुकीत त्यांचे मतदारसंघ काँग्रेसच्या वाटेस गेले होते. त्यामुळे त्यांनी बंडखोरीचा मार्ग पत्करला होता.