आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पित्याच्या निवडणूक खर्चाबाबत पंकजा यांच्या \'पोस्ट\' वर राष्‍ट्रवादीचा आक्षेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - निवडणूक खर्चाबाबत खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या विधानाच्या समर्थनार्थ त्यांच्या कन्या आमदार पंकजा पालवे यांच्या नावे प्रसिद्ध झालेल्या फेसबुक पोस्टवर राष्‍ट्रवादी कॉँग्रेसने आक्षेप घेतला आहे.


मुंडे यांनी नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात 2009 च्या लोकसभा निवडणुकीत 8 कोटी रुपये खर्च केल्याची कबुली दिली होती. निवडणूक आयोगाने त्यावर नोटिसीद्वारे स्पष्टीकरण मागितले आहे.


पंकजा पालवे यांची फेसबुकवरील पोस्ट चिथावणीखोर असून निवडणूक आयोगाचाही त्यात अवमान करण्यात आला आहे, असे राष्‍ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. आमदार पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्टचा इन्कार केला असून अकाउंट बनावट असल्याचे म्हटले आहे. असे असेल तर त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली का? पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगावे. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याबद्दल आम्ही त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करू , असे मलिक म्हणाले.


वक्फ बोर्डाचे सीईओ एन.डी. पठाण यांच्या लाचप्रकरणावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, वक्फ बोर्डाच्या कार्यपद्धतीची सीबीआय चौकशी झाली पाहिजे.