आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-शिवसेना मंंत्र्यांच्या बंगल्यांसमोर काळे कंदील; राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईत आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वाढती महागाई, शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी, लोडशेडिंग, महिलांची असुरक्षितता, रेशन दुकांनावरील गायब झालेली साखर यामुळे सरकारने राज्यातील जनतेवर काळी दिवाळीची वेळ आणली आहे. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी मंत्रालयासमोरील भाजप- शिवसेना मंत्र्यांच्या बंगल्यासमोर काळे कंदील लावले.    

सरकारची दिवाळी, तर सामन्यांचे दिवाळे या सरकारने काढले असल्याने त्याची जाणीव करून देण्यासाठी काळे कंदील लावल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले. जनतेची गळचेपी करणाऱ्या सरकारच्या निर्णयािवरोधात रस्त्यावर उतरा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अापल्या कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यानुसार खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठवड्यात मंत्रालयासमोर भारनियमना विरोधात आंदोलन करण्यात आले होते.   
 
भविष्यात सरकारविरोधातील राष्ट्रवादीच्या आंदाेलनाची धार आणखी तेज केली जाईल. मुंबईसह राज्यात सर्वत्र आंदोलन करून जनतेचा रोष सरकार दरबारी पोहोचवला जाणार आहे. जीएसटी, नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना जगणे महाग झाले असताना सरकार मात्र दररोज आश्वासनांची फेकाफेकी करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहे. मात्र, सरकार खोटे बोलत असल्याचे आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून लोकांच्या लक्षात आणून देऊ, असे वाघ यांनी स्पष्ट केले.  
  
तावडे, पाटलांत आरोप-प्रत्यारोप    
राष्ट्रवादी काँग्रेसकडून काळे कंदील लावून सरकारचा निषेध केला जात असताना दुसरीकडे आमदार कपिल पाटील व शिक्षणमंत्री िवनोद तावडे यांच्यात आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. रात्रशाळेतील शिक्षकांना नोकरीवरून कमी करण्यात आले असून शिक्षकांचे पगार नेहमीच्या बँकेत जमा न करण्याचा शिक्षण विभागाच्या निर्णयाचा निषेध करत पाटील यांनी मंगळवारी तावडेंच्या बंगल्यासमोर काळे दिवे लावले होते. पाटील यांच्या आंदोलनाचा समाचार घेताना तावडेंनी बुधवारी रात्रशाळेतील शिक्षकांना काढलेले नाही. जे शिक्षक दोन नोकऱ्या करत आहेत त्यांना एक नोकरी देण्यात आली आहे, तर युनियन बँकेऐवजी शिक्षकांचे पगार मुंबई बँकेतून देण्यात येतात. मात्र, पाटील यांचे कोणाचे तरी लागेबांधे असल्यामुळे ते दुखावले गेले आहेत, असा प्रत्यारोप तावडे यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...