आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी जनजागृती रथयात्रेला बारा डिसेंबरपासून सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ओबीसी समाजात जनजागृती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने रथयात्रा काढण्याचे नियोजन केले आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी १२ डिसेंबरपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने राज्यभर जनजागृती रथयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी दिली. शनिवारी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये पार पडली.
 
त्यात रथयात्रेचा निर्णय झाला. ही रथयात्रा नागपूरहून सुरू करण्यात येणार आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना जाहीर करा, मागासवर्ग आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला ४ हजार कोटी भागभांडवल द्या, ओबीसी दाखले सुलभरीत्या मिळावेत, क्रिमिलेअरची अट रद्द करा, आदी मागण्या करण्यात येणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...