आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Declar Sandhya Kupekar Party's Candidate For Changad By Election

संध्यादेवी कुपेकर यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर :चंदगड पोटनिवडणुक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दिवंगत आमदार व विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या पत्नी संध्यादेवी यांना मंगळवारी उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात 24 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. कुपेकर यांचे पुतणे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामसिंह यांनीही उमेदवारीसाठी उत्सुकता दाखवली होती. मात्र, त्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्या गटात नाराजी आहे.

प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी संध्यादेवी यांची उमेदवारी जाहीर करताना 2014 च्या निवडणुकीसाठी कोणालाही उमेदवारीचे आश्वासन दिले नसल्याचे स्पष्ट केले. संध्यादेवी यांच्यासह संग्रामसिंह, प्रा. मोहन कांबळे आणि रघुनाथ पाटील हे उमेदवारीसाठी उत्सुक होते.मात्र, संसदीय कामकाज समितीने संध्यादेवी यांची निवड केल्याचे पिचड यांनी सांगितले.4 फेब्रुवारी रोजी संध्यादेवी उमेदवारी अर्ज भरणार असून पिचड व आर.आर. पाटील उपस्थित राहणार आहेत. संध्या यांना बाबासाहेबांच्या पत्नी म्हणून सहानुभूती मिळू शकते, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे.