आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वक्फ’च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा वरचष्मा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या तीन जागांसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या हबीब फकीह आणि बाबाजानी दुर्राणी या दोन आमदारांनी विजयी पताका फडकवली आहे.
11 फेब्रुवारी रोजी वक्फ बोर्डाच्या तीन जागांसाठी राज्यात मदतान झाले होते. राज्यातील 360 मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. गुरुवारी मुंबईचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर ओक यांनी निकाल जाहीर केला. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार हबीब फकीह आणि राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी यांच्यासह सय्यद जमील जलाली यांना विजयी उमदेवार म्हणून घोषित करण्यात आले. काँग्रेसचे हाजी मोहम्मद कलाम व डॉ. मुदस्सर लांबे या निवडणुकीत सहाव्या स्थानावर फेकले गेले. मुस्लीम आमदारांची 13 पैकी सर्वाधिक 9 मते बाबाजानी दुर्राणी यांना पडली.