आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्‍ट्रवादीची लोकसभेच्या जागांवर उमेदवार ठरवण्‍यासाठीची बैठक निष्‍फळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा निवडणुकांसाठी जागा वाटपाबाबत चर्चेस काँग्रेस चालढकल करत असल्याने राष्‍ट्रवादीची अवस्था बिकट झाली आहे. सोमवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राष्‍ट्रवादीच्या उर्वरित आठ जागांवर उमेदवार ठरवण्यासाठी बैठक घेतली खरी, परंतु यातून काहीच निष्पन्न होऊ शकले नाही. काँग्रेस जागा वाटपांचा तिढा सोडवत नाही तोपर्यंत राष्‍ट्रवादीच्या अशा प्रकारच्या बैठकांना अर्थ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
माढा, शिरूर, मावळ, बीड, परभणी, जळगाव, रावेर व नगर या जागांसाठी संभाव्य उमेदवारांची राष्‍ट्रवादीच्या बैठकीत चाचपणी करण्यात आली. काँग्रेस व राष्‍ट्रवादीचे जागावाटपाचे 26-22 असे सुत्र आहे. मात्र बदलत्या परिस्थितीत काँग्रेस राष्‍ट्रवादीला 22 जागा सोडण्यास तयार नाही. राष्ट्रवादीने आपले सर्व उमेदवार निश्चित केले असले तरी काँग्रेसविना राष्‍ट्रवादीच्या यादीला काहीच अर्थ नाही. परिणामी चर्चा करून, समज देऊन प्रसंगी इशारा देऊन राष्‍ट्रवादी लवकरच जागा वाटप करा, यासाठी दबाव आणत आहे. मात्र काँग्रेस त्यांना फारशी किंमत दाखवत नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. त्यामुळे राष्‍ट्रवादीने आता आपल्या मित्रपक्षाला पुन्हा एकदा 48 तासांची मुदत
दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.