आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Maharashtra Pradesh President Election; Jayant Patil Take Leade

राष्‍ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदासाठी चुरस; जयंत पाटील आघाडीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेकांची चर्चा असताना ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचे नाव पुढे असल्याचे सांगितले जात आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील यांचेही नाव शर्यतीत असले तरी जयंत पाटील यांच्या नावाला पसंती दिली जाण्याची शक्यता राष्ट्रवादीतील सूत्रांनी व्यक्त केली.


गेल्या आठवड्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मंत्रिमंडळात नवीन व तरुण चेहरे देण्यासाठी राष्‍ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले. तसेच, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांचेही नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी पुढे होते; परंतु राष्ट्रवादीच्या दिल्लीतील एका वरिष्ठ नेत्याने ही शक्यता फेटाळली.


काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी मोघे : काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे आहेत. सूत्रांनुसार शिवाजीराव मोघे यांच्यावर ही धुरा सोपवली जाऊ शकते. तीन दिवसांपूर्वीच काही मंत्री व आमदारांनी सोनिया गांधींची भेट घेऊन चर्चा केली होती. मुख्यमंत्र्यांचा गटही माणिकराव ठाकरे यांना काढण्यासाठी उत्सुक असल्याचे मानले जाते.