आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist's Guard For Women Protection; Inititive Starts On Women Day

महिलांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादीच्या ‘रक्षक’ ;जागतिक महिलादिनी राज्यात होणार सुरुवात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाºया घटनांची दखल घेत राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना ‘रक्षका’च्या भूमिकेमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘रक्षका’च्या माध्यमातून पीडितांना मदत पुरवण्याचेही काम केले जाणार आहे.

अन्याय, अत्याचार, हिंसाचाराला बळी पडणाºया महिलांना पोलिस तक्रार करण्यासाठी, त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी, समाजाच्या दबावाचा प्रतिकार करण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला रक्षक मदत करतील. येत्या 8 मार्च या जागतिक महिलादिनी याची सुरुवात होणार आहे.

पीडित महिला किंवा तिच्या कुटुंबीयांना अनेकदा समाजाकडून पाठिंबा लागतो. त्यांची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेणे, कायदेशीर बाबी पूर्ण करणे, समाजातील दबावाला बळी न पडणे, तक्रारीचा पाठपुरावा करणे या गोष्टी सातत्याने कराव्या लागतात. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिला कार्यकर्त्यांना ‘रक्षक’ म्हणून जबाबदारी देण्यात येईल. हा चमू महिलांना सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा विद्या चव्हाण यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

पवारांचे मार्गदर्शन
राष्‍ट्रवादी कॉँग्रेसच्या रक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आदी मान्यवर कार्यक्रमात उपस्थित राहतील. राष्ट्रवादी युवती काँग्रेसने तरुणींच्या स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी आधीच कराटेचे वर्ग सुरू केले आहेत. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून राज्यातील महिला स्वत:चे संरक्षण स्वत:च करण्यास सज्ज होतील, असेही चव्हाण म्हणाल्या.
स्वसंरक्षणाचे धडे सुरू
गावांगावातील महिला कार्यकर्त्यांना रक्षक म्हणून संघटीत करून महिलांच्या सुरक्षाविषयक प्रश्नांकडे लक्ष पुरवण्यास तयार केले जाणार आहे. पक्षातर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रमात या रक्षक महिलांना मान्यता दिली जाईल व या योजनेची अधिकृत घोषणाही करण्यात येईल.