आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"नटसम्राट'२२ कोटींच्या घरात, उत्पन्नातील 30 टक्के रक्कम नाम फाऊंडेशनला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - "कुणी घर देता का घर' या संवादाने सध्या मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. अर्थातच महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि नाना पाटेकर अभिनीत "नटसम्राट' चित्रपटाची भुरळ सर्वांनाच पडत आहे. या चित्रपटाने आजवरची रेकार्डतोड कमाई करत केवळ ९ दिवसांत २२ कोटींची कमाई करत नवा उच्चांक गाठला आहे.

"नटसम्राट' हा चित्रपट नाना पाटेकर यांच्या वाढदिवशी म्हणजेच १ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा ही कुसुमाग्रजांच्या रंगभूमीवरील नटसम्राट या नाटकावरून घेतली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. सशक्त कथा आणि कलाकारांच्या अभिनयाने या चित्रपटाने मराठी मनावर गारुड केले आहे. या चित्रपटाचे हवे तेवढे प्रमोशनही करण्यात आले नाही. तरीही या चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे. या चित्रपटाच्या यशानिमित्त नुकतीच जंगी पार्टी करण्यात आली. यात चित्रपटातील कलावंतांसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली हाेती.

नाम फाउंडेशनला ३० टक्के रक्कम
नाना पाटेकर यांनी या चित्रपटात आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारली. नानांच्या अभिनयाला प्रेक्षक पाणावलेल्या डोळ्यांनी प्रचंड प्रतिसाद देत आहेत. नानाचा अभिनय आणि महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरेल, असे समीक्षकांना वाटते. दरम्यान, ‘नटसम्राट'च्या उत्पनातील ३० टक्के रक्कम ‘नाम फाउंडेशन’ला देण्याची घोषणा नाना पाटेकर यांनी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच केली आहे.
बातम्या आणखी आहेत...