आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैसर्गिक आहाराने मधुमेहावर कायमस्वरूपी नियंत्रण शक्य

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मधुमेहामध्ये औषधोपचाराबरोबरच योग्य आहार आणि चालणे अत्यंत आवश्यक असते. तसेच नैसर्गिक आहाराकडे लक्ष दिले तरीही मधुमेह आटोक्यात येतो आणि रुग्णाला पुन्हा औषध घेण्याची वेळ येत नाही, असा दावा ‘बीसीजे’ रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुकेतू शाह यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला.
मधुमेहाचा झाला की शेवटपर्यंत औषधे घ्यावीच लागतात, परंतु मधुमेह रिव्हर्स होऊ शकतो हे अमेरिकेतील प्रख्यात डॉ. नेल बर्नार्ड यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. क्लिनिकल रिसर्चर असलेल्या नेल बर्नार्ड यांनी ‘रिव्हर्सल डायबेटिक्स’ नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. या पुस्तकावर आधारितच बीसीजे आणि आशा पारेख रिसर्च सेंटरतर्फे संपूर्ण नैसर्गिक आहार विभाग सुरु करण्यात आला आहे.
डॉ. शाह यांनी सांगितले की, आशा पारेख रुग्णालयात यूनियनची समस्या निर्माण झाली. त्या वेळेसच मला मधुमेहाची लागण झाली. साखरेचे प्रमाण जास्त असल्याने इन्शुलीन घ्यावे लागले. त्याच वेळेस मी डॉ. नेल बर्नार्ड यांचे पुस्तक वाचले आणि त्यांनी सुचवलेले पर्याय वापरले असता मला त्याचा खूप फायदा झाला. आता मी कोणताही औषधोपचार घेत नसून मधुमेह मुक्त झालो आहे. अन्य मधुमेहींपर्यंत हा फायदा पोहोचविण्यासाठीच आम्ही नैसर्गिक आहार विभाग सुरु केला आहे.
काय आहे नैसर्गिक आहार - प्रमुख प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. दीपक दलाल या विभागाचे प्रमुख आहेत. आम्ही मधुमेहींना दूध आणि दुग्धजन्य पदार्थांबरोबरच मांसाहारापासून दूर राहण्याचा सल्ला देतो. मीठ, साखर, तेलाशिवाय शाकाहारी जेवण कसे तयार करावे ते आम्ही शिकवतो. तसेच सप्तरंगी आहार घेण्यास सांगतो. यामध्ये डाळी, पालेभाज्या आणि फळांचा समावेश आहे. मधुमेहींना आंबा वर्ज्य सांगितला जातो परंतु नैसर्गिक आहारात आम्ही आंब्याची फोड खाण्यास सांगतो. या रुग्णांनी सीताफळ आणि कलिंगड खाऊ नये तसेच सर्व प्रकारच्या मांसाहारापासून दूर राहिल्यास गोळ्या, इन्शुलिनची मात्रा कमी होऊन मधुमेह खात्रीने रिर्व्हस होतो, असा दावाही त्यांनी केला.