आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्य परिषदेच्या निवडणुकीची धुळवड; अडीच हजार मतपत्रिका गहाळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीची धुळवड रंगली असून सत्तारूढ आणि प्रतिस्पर्धी पॅनलचे उमेदवार एकमेकांवर आरोपांच्या पिचकार्‍या टाकण्यात रंगून गेले आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत अडीच हजार मतपत्रिका गहाळ होण्याची किमया झाली असून, पोलिसांकडे तक्रार गेली आहे. दोन्ही पॅनलमध्ये आरोपयुद्ध रंगले आहे.

सुमारे अडीच हजार मतपत्रिका गहाळ झाल्याची तक्रार अभिनेते विनय आपटे यांच्या ‘नटराज पॅनल’ने पोलिस आयुक्त सत्यपालसिंह यांच्याकडे केली आहे. गहाळ मतपत्रिकांपैकी 1200 मतपत्रिका जोगेश्वरी-दहिसर पट्टय़ातील पोस्ट ऑफिसांतून हरवल्या आहेत. पोस्ट सुपरिटेंडंट रमेश कदम व ‘उत्स्फूर्त पॅनल’चे उमेदवार मोहन जोशी यांचे मैत्रीपूर्ण संबंध या प्रकरणाला कारणीभूत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. कदम यांनी आरोप फेटाळले आहेत. या निवडणुकीचा आणि माझा दुरान्वयानेही संबंध नसल्याचे कदम यांनी म्हटले आहे.