आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलधारांच्या साथीने मुंबईत रंगला नौदलाचा ‘बिटिंग द रिट्रिट’ सोहळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- फेसाळत्या समुद्रलाटांच्या साथीने व पावसाच्या सरींनी नौदलाचा बिटिंग द रिट्रीट हा सोहळा साेमवारी सायंकाळी गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात उत्तरोत्तर रंगत गेला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह नौदल अधिकारी, मान्यवर पाहुणे व पर्यटकांनी भर पावसातही या सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटला. नौदलाचा बिटींग द रिट्रिट व टॅटो सेरिमनी या कार्यक्रमाचे आयोजन गेट वे ऑफ इंडिया येथे केले होते. राज्यपालांचे आगमन झाल्यानंतर नौदलाच्या वाद्यवृंदांने आपल्या अनोख्या सुरील्या बँडने त्यांचे स्वागत केले. वादनाबरोबरच त्यांच्या लयबद्ध कवायतींनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. याचवेळी आयएनएस शिक्रा येथून उड्डाण केलेल्या हेलिकॉप्टरनी सलामी दिली. तसेच त्यानंतर के २२ या नौदलाच्या तुकडीने तसेच नौदल कॅडेटनी बँडच्या तालावर कवायती सादर केल्या. अाेखी वादळाच्या प्रभावामुळे मुंबईसह परिसरात अाज बेमाेसमी पावसाने हजेरी लावली. मात्र भर पावसात उपस्थित मान्यवरांसह पर्यटकांनी या अनोख्या सोहळ्याचा आनंद लुटला.

 

पुढील स्‍लाइड वर पाहा, भरपावसात कवायती सादर करताना जवान...

बातम्या आणखी आहेत...